Karjat Nagarpanchayat Saam tv
महाराष्ट्र

Karjat Nagarpanchayat : नगरपंचायतीला पूर्णवेळ अधिकारी काही मिळेना; शेवटी नगराध्यक्ष, नगरसेवक उपोषणाला बसले

Ahmednagar News: नगराध्यक्षासह नगरसेवक बसले उपोषणाला; कर्जतला पूर्णवेळ अधिकारीच नाही

Rajesh Sonwane

सुशील थोरात

अहमदनगर : सत्ताधारी आणि विरोधक दोन आमदार असूनही कर्जत (Karjat) नगरपंचायतीला मिळेना पूर्ण वेळ अधिकारी नाही. गेल्या काही महिन्यांपासून अधिकारी नसल्याने कामे मार्गी लागत नाही. यामुळे पूर्णवेळ (Ahmednagar) अधिकारी मिळावा या मागणीसाठी अखेर नगराध्यक्ष आणि नगरसेवक उपोषणाला बसले आहेत. (Live Marathi News)

अहमदनगरच्या कर्जत नगरपंचायतीला कायमस्वरूपी अधिकारी मिळावेत यासाठी नगराध्यक्षासह नगरसेवकांनी उपोषण सुरू केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्जत नगरपंचायतमध्ये मुख्याधिकारी यांच्यासह महत्त्वाच्या अधिकारी पदावर प्रभारी अधिकारी कार्यरत आहेत. प्रभारी अधिकाऱ्यांमुळे शहरातील नागरिकांच्या समस्यांवर काम करणं कठीण झालं असून कामे प्रलंबित (NCP) राहत आहेत. प्रशासकीय अधिकारी नसल्यामुळे नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नगरअध्यक्ष उषा राऊत यांच्यासह सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अहमदनगर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. 

दोन मातब्बर आमदार 
कर्जत जामखेडला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि विधान परिषदेवर गेलेले माजी मंत्री राम शिंदे असे दोन आमदार लाभलेले आहेत. दोन्हीही आमदार मातब्बर असूनही नगरपंचायतीची अशी दशा झाल्यामुळे अखेर नगराध्यक्षांसह नगरसेवक उपोषणाला बसले आहेत. कर्जत नगरपंचायतवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. राज्यात महायुतीचं सरकार असल्यामुळे जाणीवपूर्वक अधिकारी दिले जात नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kadhi Pakoda Recipe : कढी पकोडा संडे स्पेशल मेन्यू; 'ही' रेसिपी फॉलो करा कढी अजिबात फुटणार नाही

Pune : गुरुजीचं बनले कॉपी मास्टर! 100 टक्के निकालासाठी विद्यार्थ्यांना पुरवल्या कॉपी

Revati Lele Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात; नवऱ्याचे कला क्षेत्राशी आहे खास कनेक्शन, पाहा PHOTOS

Pune Crime: पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार, धाडधाड करत ३ गोळ्या झाडल्या; नागरिक घाबरले

Maharashtra Live News Update: दहावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी 11 कॉपी बहाद्दरांवर कारवाई

SCROLL FOR NEXT