Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News: शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओतले दूध; सरकारच्या निर्णयाचा निषेध

Ahmednagar News शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओतले दूध; सरकारच्या निर्णयाचा निषेध

Rajesh Sonwane

सुशील थोरात

अहमदनगर : दुधाला उत्पादन खर्चावर आधारित किफायतशीर हमी भाव मिळावा; या मागणीसाठी (Ahmednagar) अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव  येथे विविध संघटना, कार्यकर्ते आणि दूध उत्पादकांनी  निदर्शने केली आणि रस्त्यावर (Milk) दूध ओतून शासनाचा निषेध केला. (Maharashtra News)

गायीच्या एक लिटर दुधाचा उत्पादन खर्च २६ रुपये, तर म्हशीच्या दुधाचा उत्पादन खर्च ३४ रुपये जाहीर केला आहे. त्यामुळे (Farmer) स्वामिनाथन समितीच्या शिफारशीनुसार ५० टक्के नफा धरून दर काढल्यास गाईच्या दुधाला ३९ रुपये, तर म्हशीच्या दुधाला ५१ रुपये भाव देणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र दुध उत्पादकांना ३ टक्के फॅट, तसेच ७.९ टक्के ‘एसएनएफ’साठी गायीच्या दुधाला केवळ १४ रुपये, तर म्हशीच्या ५.५ टक्के फॅट व ८.५ टक्के ‘एसएनएफ’साठी केवळ २४ रुपये दर देण्यात येत आहे. वस्तुतः चारा, जनावरांची औषधे व पशुखाद्याचे वाढलेले दर पहाता या दुध भावातून दुधाचा निम्मा उत्पादन खर्चही निघत नाही, असे आंदोलकांनी सांगितले.

रास्ता रोकोची परवानगी नाकारली 
सरकारने केलेली दूध दरवाढ ही फसवी असल्याचे म्हणत या निर्णयाच्या विरोधात शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी भातकुडगाव येथे रास्ता रोकोचा इशारा दिला होता. मात्र, शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनाला प्रशासनाने परवानगी नाकारल्याने सरकार विरोधात आणि दुधाला योग्य भाववाढ करण्याच्या मागणीसाठी शेवगाव तालुक्यातील भातकूड गाव फाटा येथे शेतकरी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून निषेध व्यक्त केला. दुधाला फॅट आणि एस.एन.एफ सारख्या जाचक अटी लावून दुध उत्पादकांना तोटा होतोय असं म्हणत शेतकऱ्यांनी ही दरवाढ फसवी असल्याचा आरोप केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: टिटवाळातील काळूनदीत २ बहिणींचा बुडून मृत्यू

Smartphone Hanging: तुमचा फोन वारंवार हॅंग होतो का? मग 'या' टिप्स करा फॉलो

Balen Shah: Gen-Z क्रांती! कर्नाटकात शिक्षण, नंतर महापौर, प्रसिद्ध रॅपर नेपाळचा कारभार हाकणार?

Maharashtra Politics: मोठी उलथापालथ; ठाण्यात शिंदेंची राजकीय खेळी; भाजपच्या आठ शिलेदारांचा शिवसेनेत प्रवेश

RBI Vacancy 2025 : RBIमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १० ऑगस्टपासून ऑफिसर पदासाठी भरती

SCROLL FOR NEXT