PM Narendra Modi in Shirdi News Twitter/@ANI
महाराष्ट्र

Narendra Modi: PM मोदींच्या कार्यक्रमासाठी १००० बस बूक; फेऱ्या रद्द झाल्याने विद्यार्थ्यांसह, प्रवाशांचा खोळंबा

PM Narendra Modi Maharashtra Tour: मोदींच्या शिर्डी येथे आज होत असलेल्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे

रोहिदास गाडगे

PM Narendra Modi Shirdi Visit:

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिर्डी येथे आज होत असलेल्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव, खेड आणि शिरुर तालुका एसटी आगारातील बसेस पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात बसच्या फे-या कमी केल्याने विद्यार्थ्यांसह, प्रवाशांचे चांगलेच हाल झाल्याचे पाहायला मिळाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) आज शिर्डीमध्ये (Shirdi) आले असून विविध विकास कामांचे उद्घाटन व भुमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी लोकांना येता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने एसटी महामंडळाच्या तब्बल एक हजार बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

यासाठी उत्तर पुणे (Pune) जिल्ह्यातील राजगुरूनगर मंचर नारायणगाव आणि जुन्नर आगारातुन एसटी बस आरक्षित करण्यात आल्याने ग्रामीण भागातील नेहमीच्या मार्गावरील फेऱ्या आज रद्द करण्यात आल्या आहेत.

याचा सर्वाधिक फटका बसने शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह गोरगरीब प्रवासी नागरिकांना बसला आहे. दरम्यान, या कार्यक्रमामुळे एसटी महामंडळाची (MSRTC) मात्र चांगलीच कमाई होणार आहे. या एक हजार बसेसचे जेवढे किलोमीटर होईल, त्यानुसार भाडे आकारले जाणार आहे. प्रतिकिलोमीटर 55 रुपये भाड्यानुसार एसटी महामंडळाला सुमारे अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजितदादांच्या अपघात आणि घातपात मागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण? मफलरवाल्या पोस्टरने राजकारण तापलं!

Assam Kaziranga Accident: डोळ्यांच्या पापण्या लवते न लवते तोच अनर्थ घडला! भरधाव ट्रॅव्हलर थेट कंटेनर ट्रकवर आदळला; २४ जणांचा मृत्यू

Saturday Horoscope: या 3 राशींना मिळणार आनंदाची बातमी, तर काहींनी पैशांच्या बाबतीत राहावं सावध!

छठ पूजेविरोधात ठाकरे मैदानात; 'यूपी निवडणुकीसाठी छठ पूजेच्या वादाचा घाट

संजय शिरसाटांच्या घरावर बाटलीफेक; पोलीस प्रशासनाच्या कारभारवर शिरसाट संतप्त

SCROLL FOR NEXT