Dhangar Reservation Saam tv
महाराष्ट्र

Dhangar Reservation : धनगर आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटणार; सरकारने दिलेली मुदत संपली, उद्यापासून पुन्हा आंदोलन सुरू

Ahmednagar News : धनगर आरक्षणामधल्या अडचणी दूर करण्यात येतील आणि आरक्षणाचा मार्ग सुकर होईल असे आश्वासन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते

Rajesh Sonwane

सुशील थोरात

अहमदनगर : धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे (Ahmednagar) यासाठी आंदोलन उभारले असून यासाठी राज्य शासनाने दिलेली मुदत संपत आल्याने (Dhangar Reservation) धनगर समाज पुन्हा आंदोलनासाठी उतरला आहे. (Maharashtra News)

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे आणि अन्य मागण्यांसाठी धनगर समाजातील आंदोलकांच्यावतीने चौंडीमध्ये २१ दिवसांचे आमरण उपोषण आंदोलन सुरु केलं होते. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून त्यांच्याकडून ५० दिवसांच्या आत अहवाल घेऊन तांत्रिक बाजू पूर्ण करण्यात येईल. धनगर आरक्षणामधल्या अडचणी दूर करण्यात येतील आणि आरक्षणाचा मार्ग सुकर होईल असे आश्वासन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उद्यापासून उपोषण 

यशवंत सेनेच्यावतीने या ठिकाणी राज्य सरकारने उपोषण सोडवण्यासाठी पहिल्यांदाच लेखी आश्वासन दिले होते की आम्हाला वेळ द्या अभ्यास करून धनगर आरक्षण बाबत तोडगा काढू. त्यासाठी सरकारने पन्नास दिवसाचे वेळ घेतला. मात्र त्यानंतर अद्याप काहीही हालचाल नाही. त्यामुळे आता पुन्हा चौंडी येथे यशवंत सेनेच्यावतीने १६ नोहेंबरपासून धनगर समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून आमरण उपोषणाला बसणार असल्याचे यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दौलतडे यांनी सांगितले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

सासरच्या छळाला कंटाळली! महिला पोलीस कॉन्स्टेबलनं आयुष्य संपवलं; VIDEOतून केला खुलासा

Maharashtra Rain Live News: तब्बल आठ तासानंतर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला

Crop Insurance : मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांची पिक विम्याकडे पाठ; वर्धा जिल्ह्यातील केवळ ५९ हजार शेतकऱ्यांनी उतरविला विमा

Mumbai News: मुंबईत पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळला, भीतीपोटी पोलीस अधिकाऱ्यानं सरकारी घर सोडलं

SCROLL FOR NEXT