Leopard Attack Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात ९ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावातील घटना घडली आहे. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गावातील ही धक्कादायक घटना आहे.

Rajesh Sonwane


सचिन बनसोडे 

लोणी (अहमदनगर) : नगर जिल्ह्यातील लोणी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार असल्याचे (Ahmednagar) दिसून आले आहे. यात घराजवळील शेतात खेळत असलेल्या ९ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने (Leopard) हल्ला केला. यात मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोणी परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे. (Maharashtra News)

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावातील घटना घडली आहे. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गावातील ही धक्कादायक घटना आहे. रविवारी (१४ जानेवारी) सायंकाळी ही घटना घडली, अथर्व प्रवीण लहामगे (वय ९) असे मृत मुलाचे नाव आहे. अथर्व हा घराजवळच खेळत होता, यावेळी त्याच्यावर बिबट्याने हल्ला (Leopard Attack) केला. घराजवळील शेतात मुलावर बिबट्याचा हल्ला केला होता. मुलगा सापडत नसल्याने त्याचा शोध घेतला. दरम्यान रात्री दहा वाजता मुलाचा मृतदेह सापडला. (Forest Department) वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनेक दिवसापासून बिबट्याचा परीसरात मुक्त संचार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत वन विभागाला माहिती देत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र वन विभागाच्या हलगर्जीपणा मुलाच्या जिवावर बेतला आहे. वेळीच बिबट्याला जेरबंद केले असते तर घटना टळली असती. या घटनेनंतर नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परळीत ज्ञानेश कुमारांच्या विरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन

Health Tips : जेवण करताना वारंवार जीभ दातात का अडकते? जाणून घ्या कारणे आणि आरोग्य टिप्स

मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक-कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू, धडकेनंतर उघडलं गांजाचं गुपित

Ladki Bahin Yojana : पात्र आहात पण खात्यावर ₹१५०० येत नाहीत? लाडक्या बहिणींनो हे काम आताच करा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शरद पवार सरसावले! 'या' शहरासाठी 'इतक्या' लाखांची मदत|VIDEO

SCROLL FOR NEXT