सचिन बनसोडे
राहाता (अहमदनगर) : घरगुती गॅस सिलिंडर लीक होऊन सिलेंडरचा स्फोट झाला. यात घरातील नऊ जणांसह जनावरे होरपळल्याची घटना राहाता तालुक्यातील एकरुखे गावात सकाळच्या सुमारास घडली आहे. जखमी व्यक्तींवर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींमध्ये महिला, पुरुष आणि लहान बालकांचाही समावेश आहे.
अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील एकरुखे गावातील वायकर वस्तीवर राहणारे भाऊसाहेब वायकर यांच्या घरातील गॅस सिलेंडर संपले होते. यामुळे नवीन गॅस सिलेंडर लावत असताना यातून मोठ्या प्रमाणात गॅस गळती होऊ लागली. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी गॅस सिलेंडर घराबाहेर आणले. मात्र बाजूच्या घराबाहेर पाणी तापवण्यासाठी सुरू असलेल्या चुलीतील जाळाचा आणि (Gas) गॅसचा संपर्क आल्याने मोठा स्फोट झाला. हा स्पोट इतका भयंकर होता की परिसरात जाळाचा मोठा भडका उडाला.
गॅस सिलेंडरच्या बदल्यात घरातील महिला, पुरुष आणि लहान मुलांसह नऊ भाजले गेले. तसेच गोठ्यातील चार ते पाच जनावरे होरपळी आहेत. आजूबाजूच्या नागरिकांनी जखमींना लागलीच उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जनावरांवरही उपचार सुरू आहेत. गॅस गळतीमुळे झालेल्या स्पोटाने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.