Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Bribe Case : वजन मापे विभागातील निरीक्षक एसीबीच्या ताब्यात; महसूल मंत्र्यांच्या संस्थेकडेच मागितली लाच

Ahmednagar News : राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकारी ट्रक वाहतूक संस्था संचलित पेट्रोल पंपाच्या वार्षिक पडताळणीसाठी दहा हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

लोणी (अहमदनगर) : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या संस्थेकडे वजन मापे विभागातील निरीक्षकाने (Bribe) लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. (Ahmednagar) या लाचखोर निरीक्षकास १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकारी ट्रक वाहतूक संस्था संचलित पेट्रोल पंपाच्या वार्षिक पडताळणीसाठी दहा हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. वजन मापे विभागाचे निरिक्षक अशोक श्रीपती गायकवाड असे लाचखोर निरीक्षकांचे नाव आहे. अशोक गायकवाड याने १२ हजार रुपयांची‌ मागणी केली होती. याबाबत (ACB) एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१० हजार स्वीकारताना अटक 

तडजोडअंती ठरलेली १० हजारांची लाच स्विकारताना अशोक गायकवाड यास रंगेहाथ पकडले. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT