Ahmednagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar Crime : चैन स्नॅचिंग करणारी टोळी ताब्यात; २० तोळे सोन्याचे दागिने हस्तगत

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात चैन स्नॅचिंगच्या वारंवार होणाऱ्या घटना बघता पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तपासाचे आदेश दिले होते.

Rajesh Sonwane

सुशील थोरात
अहमदनगर
: रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील चैन तोडून नेल्या जाण्याच्या घटनांमध्ये मागील काही दिवसात वाढ झाली होती. पोलिसांनी याचा शोध घेत चैन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यानंतर जिल्ह्यातील १४ गुन्हे उघड झाले असून त्यांच्याकडून १७ लाखंच्या २० तोळे सोन्याच्या दागिने हस्तगत केले आहेत. 

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात चैन स्नॅचिंगच्या वारंवार होणाऱ्या घटना बघता पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तपासाचे आदेश दिले होते. दरम्यान जिल्ह्यात घडलेल्या चैन स्नॅचिंगच्या घटनेची पद्धत बघता पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेतला. तसेच सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे तपास केला असता रेकॉर्डवरील गुन्हेगार विनोद चव्हाण हा वेगवेगळ्या साथीदारासोबत जिल्ह्यात चैन स्नॅचिंग करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

१७ लाखाचे दागिने हस्तगत 

यानंतर पोलिसांनी (Police) विनोद चव्हाण याला अटक करून त्याच्या दोघां साथीदारांना अटक केली आहे. दरम्यान त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता जिल्ह्यातील अहमदनगर शहरासह कोपरगाव, संगमनेर, शिर्डी, राहुरी,श्रीरामपूर या ठिकाणी चैन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून तब्ब्ल १७ लाख रुपयांच्या २० तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Real vs Fake Watermelon: कलिंगड खरं की खोटं कसं ओळखाल?

महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी एकत्र याच; 'मराठीच बोलू' चळवळीत व्हा सहभागी

Maharashtra News Live Update : आर्थिक फसवणूक प्रकरणात अशोक खरातला ४ दिवसांची कोठडी

Marriage Pressure Turns Fatal: बुलढाण्यात धक्कादायक घटना; लग्न न जुळल्याच्या नैराश्यातून २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या

Western Railway News : विरार-डहाणूकरांसाठी मोठी बातमी, १५ डब्यांची लोकल धावली, तिकीट किती? कोणते थांबे असणार?

SCROLL FOR NEXT