Ahmednagar News  Saam Digital
महाराष्ट्र

Ahmednagar News : बायोगॅसच्या विहिरीत पडलेली मांजर बचावली; मदतीला गेलेल्या ५ जणांनी गमावला जीव

Ahmednagar News Update : बातमी आहे एका मांजरीला वाचवताना घडलेल्या मृत्यूच्या तांडवाची. अहमदगरच्या नेवासात दोन दिवसांपूर्वी मांजरीला वाचवताना 5 जणांचा मृत्यू झालाय. मात्र ती मांजर अद्याप जिवंत असल्याचं समोर आलंय.

Sandeep Gawade

सचिन बनसोडे, अहमदनगर

बातमी आहे एका मांजरीला वाचवताना घडलेल्या मृत्यूच्या तांडवाची. अहमदगरच्या नेवासात दोन दिवसांपूर्वी मांजरीला वाचवताना 5 जणांचा मृत्यू झालाय. मात्र ती मांजर अद्याप जिवंत असल्याचं समोर आलंय. अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील वाकडी इथं असलेली हीच ती विहिर. तीन दिवसांपूर्वी यात विहिरीत बुडून पाच जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला कारण ठरली ती एक मांजर.

बायोगॅसच्या या विहिरीत मांजर पडली म्हणून तिथच काम करत असलेल्या बबलू काळे नावाचा तरूण विहिरीत उतरला. मात्र ही विहिर शेणानं भरलेली असल्यानं त्याला ते त्यात बुडाला त्याला वाचवण्यासाठी वडील अनिल काळे, काका माणिक काळे, चुलत भाऊ संदीप काळे तसच तिथच काम करणारे शेतमजूर बाबासाहेब गायकवाडही विहिरीत उतरले मात्र यातील कुणाचाच जीव वाचू शकला नाही. या दुदैवी घटनेनं वाकडी गावावर शोककळा पसरलीय.

विशेष म्हणजे ज्या मांजरीला वाचवण्यासाठी जिवाची बाजी लावली ती मांजर या विहिरीत अद्यापही जिवंत आहे. विहिरीच्या एका कपारीत बसलेली मांजर सुटकेच्या प्रतिक्षेत आहे. मात्र इथं घडलेलं मृत्यूचं तांडव पाहिल्यानंतर कुणीही या सापळ्यात उतरायला तयार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025: महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरच नाही तर देशातील ७ प्रसिद्ध ठिकाणीही श्राद्ध, पिंडदान करतात

Pune Rain : पुण्यात मुसळधार पावसाचा कहर, रस्ते जलमय; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर, VIDEO

Donald Trump: अपघातातून थोडक्यात बचावले डोनाल्ड ट्रम्प; हवेतच होणार होती दोन विमानांची धडक

Maharashtra Live News Update: पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

Tanushree Dutta: 'फार्महाऊसवर न येता, तू हिरोईन...'; तनुश्री दत्ताने बॉलिवूडवर पुन्हा केले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT