Kopargaon APMC  Saam TV
महाराष्ट्र

Kopargaon APMC Election : बाजार समितीत भाजप-राष्ट्रवादी-ठाकरे गटाची युती, अहमदनगरमधील अनोख्या युतीची चर्चा

कोपरगाव बाजार समितीत काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या विरोधात भाजप, राष्ट्रवादी, ठाकरे समर्थकांचा एक फुटीर गट निवडणूक लढवत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

Ahmednagar News: राजकारणात कधी काय होईल याचा काही नेम नाही. आज विरोधक असलेले कधी मित्र बनतील सांगता येत नाही. असाच प्रकार कोपरगाव बाजार समिती निवडणुकीत पाहायला मिळाले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव बाजार समीतीत भाजप, राष्ट्रवादी आणि ठाकरे समर्थक एका गटाची सहमती एक्सप्रेस धावताना दिसत आहे. (Latest News Update)

एकीकडे एकमेकांचे प्रतीस्पर्धी असलेले राजकीय नेते बाजार समितीत मात्र एकमेकांना साथ देताना दिसत आहेत. कोपरगाव बाजार समितीत काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या विरोधात भाजप, राष्ट्रवादी, ठाकरे समर्थकांचा एक फुटीर गट निवडणूक लढवत आहेत. (Political News)

कोपरगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आशुतोष काळे आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे समर्थकांनी या निवडणुकीत एकत्र पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकमेकांच्या सहकार्यासाठी तयार झालेल्या या अनोख्या युतीची चर्चा सध्या होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT