Sanjay Raut News: खारघर दुर्घटना प्रकरणात आतापर्यंत १५ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. खारघर दुर्घटना प्रकरणावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार संजय राऊत यांनीही खारघर दुर्घटना प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. खारघर मैदानावरील सत्ताधाऱ्यांच्या एसीमधील शाही मेजवानीवरून संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, 'खारघर प्रकरणात मृतांचा आकडा ५ नंतर सात झाला, त्यानंतर ९ झाला, त्यानंतर 11 झाला आणि आता तो आकडा १४ वर आला आहे. रुग्णालयात हे लोक जे अत्यावश्यक परिस्थितीत आपल्या घराकडे निघाले होते, ते आपल्या घराकडे पोहोचलेत की नाही? त्यातील अनेकांची परिस्थिती गंभीर होती'.
'आमच्या मनात भीती आहे, त्यांचा आकडा 50 वर जाऊ शकतो. ही जर माझी भूमिका असेल तर भारतीय जनता पक्ष आणि मिंधे गटातील लोकांना यातना होण्याची गरज काय? हा आकडा आला त्याला जबाबदार कोण आहे? ढिसाळ कारभार कोणी केलं, लोकांना उन्हात ठेवलं. त्यांना पाणी का मिळालं नाही? अन्न का मिळालं नाही? त्यांची व्यवस्था काय होती? लोक 40 डिग्रीत उन्हामध्ये तडफडत होते, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
'खारघरच्या मैदानावर एसी शामियान्यात भाजपचे मंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र, देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे शाही मेजवानीत बसले होते. त्यांचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. तुमच्या कानावर त्यांच्या किंकाळ्या आक्रोश आला नाही? तुमची सभ्यता मेली होती का? तुम्ही माझ्या विरोधात तक्रार दाखल करताय जरूर करा, अशी टीका राऊत यांनी केली.
'लोकांना कळू द्या की निर्घृण पद्धतीने राजकारण चाललंय, जरूर माझ्या विरोधात तक्रार झाली पाहिजे. मेलेल्यांच्या मड्यावरचं लोणी खाणारे हे लोक आहेत, अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.