Ahmednagar News Assistant Engineer arrested by ACB for taking Rs 1 crore bribe Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar News: बापरे! १ कोटींची लाच घेताना सहाय्यक अभियंता रंगेहाथ पकडला; लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई

Ahmednagar Crime News: अहमदनगरमधील महाराष्ट्र औद्योगिक प्रदेश औद्योगिक विकास महामंडळाच्या सहाय्यक अभियंत्याला तब्बल १ कोटींची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे.

Satish Daud

सुशील थोरात, साम टीव्ही

Ahmednagar Latest News

मागील काही दिवसांपासून राज्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. लाचखोर अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने मोहिम हाती घेतली आहे. एकीकडे नांदेड येथील अभियंत्यास लाच घेताना पकडल्याची घटना ताजी असतानाच अहमदनगरमध्येही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

नगरमधील महाराष्ट्र औद्योगिक प्रदेश औद्योगिक विकास महामंडळाच्या सहाय्यक अभियंत्याला तब्बल १ कोटींची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वाल्हवरकर यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई केली आहे.

अमित गायकवाड (वय ३२ वर्ष , रा. नागापूर ) असे लाचखोर सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी नागापूर एमआयडीसी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर येथील औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत तक्रारदार ठेकेदाराने १०० एम एम व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते.

या कामाचे बिल २ कोटी ९९ लाख रुपये इतके होते. काम झाल्यानंतर तक्रारदाराने बिलाची मागणी केली. तेव्हा मागील बिल आउटवर्ड वर घेऊन तत्कालीन उपअभियंता गणेश वाघ यांची स्वाक्षरी घेण्यासाठी स्वाक्षरी घेण्यासाठी सहाय्यक अभियंता अमित गायकवाड यांनी तक्रारदाराकडे १ कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली.

तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी याची तक्रार नाशिक (Nashik) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदाराला धीर देऊन आरोपींनी मागितलेली रक्कम देण्यास सांगितले.

ठरलेली रक्का शुक्रवारी सायंकाळी नगर-छत्रपती संभाजी नगर रोडवरील शेंडी बायपास येथे स्वीकारण्याचे ठरले. त्यानुसार गायकवाड हा रोडच्या बाजूला असलेल्या आनंद सुपर मार्केटच्या मोकळ्या जागेत आला. त्याला लाच स्वीकारताना नाशिक येथील पथकाने रंगेहात पकडले.

रात्री उशिरापर्यंत या घटनेचा पंचनामा सुरू होता. या प्रकरणी नागापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणांमध्ये तत्कालीन अभियंता गणेश वाघ यांचा देखील 50% वाटा होता, अशी कबुली अटकेत असलेल्या अमित गायकवाड यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC : दिवाळीच्या दिवशी कंत्राटी कामगारांचं ठिय्या आंदोलन; बोनस न मिळाल्याने संताप व्यक्त

Vastu Tips Of Broom: झाडूविषयी हे नियम तुम्हाला माहित आहे का?

Maharashtra Live News Update : यवतमाळमध्ये परतीच्या पावसाने झोडपलं

Lakshmi Pujan 2025: लक्ष्मीपूजनाच्या रात्री मीठाचा हा उपाय जरूर करा, घरात नांदेल सुख- शांती

Muhurut Trading 2025 : शुभ मुहूर्तावर सेन्सेक्स-निफ्टीची सौम्य तेजी; कोणते शेअर्स चमकले?

SCROLL FOR NEXT