Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News : आरोपीने पोलिसावर रोखले पिस्तूल; स्वसंरक्षणासाठी आरोपीच्या पायावर गोळीबार, तीन आरोपी अटक

आरोपीने पोलिसावर रोखले पिस्तूल; स्वसंरक्षणासाठी आरोपीच्या पायावर गोळीबार, तीन आरोपी अटक

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात

अहमदनगर : कार घेऊन फरार होत असलेल्‍या आरोपींना पोलिस ताब्‍यात घेत होते. यावेळ झटापट होवून आरोपीने पोलिसांवरच (Police) बंदूक रोखल्‍याची घटना घडली आहे. या प्रकारानंतर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याचे चित्र निर्माण झाले असून (Ahmednagar) गुंडांवर कोणाचा धाक राहिल्याचा दिसत नाही. (Maharashtra News)

जामखेड शहरात एका धक्कादायक घटना घडली असून काही गुंडांनी एका कार चालकाला डोक्याला बंदूक लावून कार पळवली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हे आरोपी शोधण्यासाठी पोलीस जात असताना खर्डा रस्त्यावर एका हॉटेलसमोर तीन संशयित आरोपी बसलेले दिसताच पोलीसांनी त्यांना (Crime News) ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी झटापट झाली. यामध्ये दोन पोलीस किरकोळ जखमी झाले.

पोलिसांकडून गोळीबार

यादरम्यान एका आरोपीने पिस्टलमधून पोलीसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीच्या पायावर गोळीबार केला. ही धक्‍कादायक घटना घडली असल्‍याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या रूपाची चर्चा, सौंदर्याने सर्वांनाच केलं थक्क

Shagun Sharma: 'सेटवर त्याने खूप त्रास दिला'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा गौरव खन्नावर गंभीर आरोप, म्हणाली, 'तो सतत अपमान...'

Maharashtra News Live: श्रीक्षेत्र रांजणगावच्या श्री महागणपती मंदिराचे दरवाजे आजपासून पुन्हा भाविकांसाठी खुले

August New Rules : 1 ऑगस्टपासून 5 मोठे नियम लागू; LPG सिलेंडर स्वस्त, तत्काळ तिकीट बुकिंगपासून KYC पर्यंत मोठे बदल

तुम्ही 10 घेतले, आम्ही 100 घेतले; पक्षप्रवेशावरून शिंदेसेना-भाजप आमने-सामने, महायुतीत अंतर्गत कलह उफाळला

SCROLL FOR NEXT