Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News: अल्पवयीन मुलीवर अत्याचार; न्‍यायालयाने सुनावली २० वर्ष सक्‍तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; न्‍यायालयाने सुनावली २० वर्ष सक्‍तमजुरीची शिक्षा

साम टिव्ही ब्युरो

अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेल्या आरोपीस २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व दंडाची (Court) शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास १ महिना साधी कैदेची शिक्षा अतिरिक्त व विशेष (पोक्सो) जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी मोरे यांनी ठोठावली आहे. (Live Marathi News)

तिसरीच्‍या वर्गात शिकणारी आठ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या घरासमोरील ओट्यावर खेळत होती. या दरम्‍यान आरोपी रशीद सरदार बेग (वय २८) याने मोबाईल खेळायला देतो; असे म्हणून तिच्या हाताला धरून घरी घेऊन आला. तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर शारीरिक (Crime News) अत्याचार केला. हा प्रकार २४ सप्टेंबर २०२० रोजी झाला. पीडित मुलीने घडलेली घटना तिच्या आईला सांगितली. पीडित मुलीचे आईने एमआयडीसी पोलिसांना ही माहिती दिली. पोलिस तात्काळ घटनास्थळी आले.

आरोपीविरूद्ध दिली तक्रार

पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपी रशीद बेग याच्याविरूद्ध अत्याचार आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक विनोद जाधोर यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

बारा साक्षीदार तपासले

खटल्यामध्ये अॅड. मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज पाहिले. सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासण्यात आले. ॲड. अॅड. मनिषा केळगंद्रे यांनी समाजात वाढणारी विकृती पाहता या प्रकरणामध्ये आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होणे गरजेचे आहे, असा युक्तीवाद केला. न्यायालयाने युक्तीवाद ग्राह्य धरून रशीद याला २० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैदेची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार भगवान वंजारे आणि आडसूळ यांनी सहकार्य केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, सह्याद्री पट्ट्यात जोरदार पावसाच्या सरी

Shivali Parab Photos: 'शुभ दिपावली!' दिवाळीनिमित्त कल्याणच्या चुलबुलीचं सुंदर सौंदर्य, फोटो पाहतच राहाल

Bhaubeej Special : प्रेम आणि नात्यांचा अनोखा उत्सव, वीटभट्टीवर कष्टकरी मजुरांनी साधेपणात साजरी केली भाऊबीज

Pune Nilesh Ghaywal Case: निलेश घायवळला मोठा झटका; पासपोर्ट अखेर रद्द

रिलसाठी तोंडात सुतळी बॉम्ब ठेवून पेटवली; सेकंदातच स्फोट झाला, संपूर्ण जबडा फाटला

SCROLL FOR NEXT