Akole Taluka Food poisoning  Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar News: हळदीच्या कार्यक्रमात जेवणातून 200 जणांना विषबाधा; धक्कादायक घटनेने अहमदनगरमध्ये खळबळ

Akole Taluka News: हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून तब्बल 200 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात बुधवारी (ता. २८) रात्रीच्या सुमारास घडली.

Satish Daud

सचिन बनसोडे, साम टीव्ही

Akole Taluka Food poisoning

हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून तब्बल 200 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात बुधवारी (ता. २८) रात्रीच्या सुमारास घडली. जुलाब आणि उलटीचा त्रास जाणवल्याने अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विषबाधा झालेल्यांमध्ये ७ बालकांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. या घटनेनं अकोले तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोले तालुक्यातील (Ahmednagar News) मवेशी करवंदरा गावात बुधवारी नवरदेवाच्या घरी हळदीचा कार्यक्रम होता.

या कार्यक्रमात नवरदेवाच्या नातेवाईकांसह गावातील काही मंडळींसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, जेवणानंतर रात्री अनेकांना जुलाब आणि उलटीचा त्रास जाणवू लागला. प्रकृती खालवत असल्याने 200 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  (Latest Marathi News)

यापैकी 59 लोकांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात तर काहींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. विषबाधा झालेल्या व्यक्तींमध्ये ७ बालकांचा देखील समावेश आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

माजी आमदार वैभवराव पिचड यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन रुग्णांना मदत करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. अति गंभीर रुग्णांना तातडीने नाशिक, संगमनेर येथे हलविण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

Maharashtra News Live Updates: मुंबई नाशिक महामार्गावरील दोन्ही मार्गावरील वाहतूक मंदावली

Washim Bajar Samiti : आठवडाभरातच सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक; वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीतील स्थिती

Devendra Fadnavis : 'बटेंगे तो कटेंगे' हा देशाचा इतिहास, देवेंद्र फडणवीसांचं योगींच्या घोषणेला समर्थन

Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj : 'आईविना जगण किती अवघडं असतं' धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ट्रेलर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT