Ahmednagar Accident Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar News : पाथर्डी माणिकदौंडी घाटातील टँकर अपघात दोघांचा मृत्यू, पोलीस प्रशासनाची माहिती

Ahmednagar News : गणेश पालवे हा या टँकरचा दुसरा चालक होता.

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात

Ahmednagar News : अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडीच्या घाटात आज सकाळी झालेल्या टँकर अपघतात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर टँकरला भीषण आग लागली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,इथेनॉल टँकर अपघाताता 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या टँकरमध्ये चालक आणि इतर प्रवासी प्रवास करत होते. टँकर पलटी झाल्यानंतर काही लोकांनी उड्या घेतल्या. त्यात लहू सांडू पवार, सुमन लहू पवार, जगदीश जगन पवार, कोमल जगन पवार हे प्रवाशी किरकोळ जखमी झाले होते. (Maharashtra News)

तर गणेश रामराव पालवे,सुरैया बशीर शेख हे गंभीर जखमी झाले होते. सर्व जखमींवर पाथर्डी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. या जखमींपैकी गंभीर जखमी झालेल्या गणेश रामराव पालवे हा टँकर चालक तर प्रवासी सुरैया बशीर शेख यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

गणेश पालवे हा या टँकरचा दुसरा चालक होता. मात्र गणेश हा टँकरच्या डाव्या बाजूला बसलेला होता. त्याच बाजूने टँकर पलटल्याने तो टँकर खाली सापडला होता. महिला अत्यंत गंभीररित्या जखमी झाली होती. तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

माणिकदौंडीच्या घाटात एक टँकर पलटी झाल्यानंतर टँकरला मोठी आग लागली होती. त्यामुळे टँकर जवळ काेणालाही जाता येत नव्हते. आगीचा (fire) भडका वाढल्याने घाटातील वाहतूकही दोन्ही बाजूने बंद करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

Pune crime news: पुण्यात रक्तरंजित थरार! बायकोशी अफेअर असल्याचा संशय; नवऱ्याने तरुणाला क्रूरपणे संपवलं

Crime: हात-पाय बांधले, तोंडात कापड कोंबलं; नंतर महिलेला जागीच संपवलं, गावात उडाली खळबळ

लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले नाही, महिलांची e-KYC करण्यासाठी एकच झुंबड; अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT