Ahmednagar: महिला सरपंचास मारहाण; 8 जणांविरोधात गुन्हा दाखल
Ahmednagar: महिला सरपंचास मारहाण; 8 जणांविरोधात गुन्हा दाखल सचिन आगरवाल
महाराष्ट्र

Ahmednagar: महिला सरपंचास मारहाण; 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

सचिन आगरवाल

सचिन आगरवाल

अहमदनगर: अहमदनगर Ahmednagar जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीच्या बैठकीतच महिला सरपंचास मारहाण करत व हात उगारत विनयभंग केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात Belvandi Police Station गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

गावातील महादेव मंदिरासमोर तंटामुक्त अध्यक्ष निवड करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. सर्वानुमते गणेश महाडिक यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्याचवेळी विलास महाडिक, राहुल महाडिक, नितीन महाडिक, संकेत महाडिक, अनिल महाडिक, राजू कातोरे, दशरथ कातोरे, दिलीप कातोरे यांनी हा अध्यक्ष आम्हाला मान्य नाही असे म्हणत गोंधळ घातला.

त्यावर ही बैठक तहकूब करण्यात आली. ही बैठक तहकूब करण्यात आल्यानंतर महिला सरपंच ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या. पाठीमागून आरोपी विलास महाडिक व इतर आरोपी कार्यालयात आले त्यांनी पाठीमागून येत महिला सरपंचास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत मारहाण करण्यास हात उचलला. तिथे उपस्थित असलेल्या बापू कातोरे, विश्वास कातोरे, प्रसाद महाडिक यांना लाथाबुक्यांनी मारहाण करत त्यांचे कपडे फाडण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर विरोध गटाने ही परस्पर विरोधी फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास बेलवंडी पोलीस करत आहेत.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचं 'पानीपत'; IPLमधील कोलकाताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा बहजत 'या' कारला आहे मागणी

Maharashtra Election: नाशकातून शिंदे गटाने तिकीट दिल्याचा दावा; कोण आहेत शांतीगिरी महाराज?

SCROLL FOR NEXT