anandacha siddha, maharashtra, maharashtra mantrimandal nirnay, cm eknath shinde saam tv
महाराष्ट्र

Anandacha Shidha : गोरगरिबांना आनंदाचा शिधा पाडव्याला मिळणार की नाही? समोर आली महत्वाची माहिती

आनंदाचा शिधा केव्हा मिळणार, याबाबत अहमदनगर जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात

अहमदनगर : राज्य सरकारने २२ मार्चला गुढी पाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎ जयंती निमित्ताने राज्य सरकारने आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली होती. सरकारने हा आनंदाचा शिधा रेशन दुकानातून देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नागरिकांना हा शिधा मिळाला नाही. त्यामुळे आनंदाचा शिधा केव्हा मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, आनंदाचा शिधा केव्हा मिळणार, याबाबत अहमदनगर जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी महत्वाची माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

२२ मार्चला गुढी पाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎ जयंती निमित्ताने महाराष्ट्र सरकारने घोषणा केली. त्या प्रमाणे रेशन‎ दुकानातून आनंदाचा शिधा देण्यात‎ येणार आहे. मात्र तो अद्याप दुकानात‎ आलेला नाही.

या शिधा मध्ये एक किलो साखर,एक किलो चना डाळ,एक किलो तेल आणि एक किलो रवा देण्याची घोषणा केली होती याविषयी माहिती‎ घेतली असता तो शासकीय‎ गोदामातच आलेला नसल्याचे समोर‎ आले आहे. त्यामुळे गोदामातच‎ नसताना, दुकानात कसा येणार‎ आणि वेळेत वाटप कसे होणार ? हा‎ प्रश्न आहे.‎

अहमदनगर जिल्ह्यात सहा लाख 84 हजार तीनशे एक इतके लाभार्थी असून अहमदनगर जिल्ह्यात अद्याप संपूर्ण शिधा मिळाला नसून चार वस्तू आल्या नंतर मार्च अखेर पर्यंत आनंदाचा शिधा वाटप करण्यात येईल, अशी माहिती अहमदनगर जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली आहे.

दिवाळी सणामध्ये आनंदाचा‎ शिधा वाटप करताना आलेल्या‎ अडचणी पाहून आता पुरवठा‎ विभागाने तालुकावार नियोजन केले‎ आहे. शिधा वाटपास कर्मचारी‎ संपाचा अडथळा होता. मात्र आता संप‎ मिटल्याने तो दूर झाला आहे. पण‎ सर्व गोदामात‎ आनंदाचा शिधा उपलब्ध होईल,‎ त्याच दिवशी अधिकाधिक‎ दुकानापर्यंत शिधा पोहचविण्याचा‎ प्रयत्न आहे, अशीही माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी‎ जयश्री माळी यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT