Ahmednagar Crime News Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar Crime News : अख्खा महाराष्ट्र हादरला! पारनेरमध्ये चिमुकल्यासह आईची कारने चिरडून हत्या

Parner Crime NEws : आरोपींविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

प्रविण वाकचौरे

सुशील थोरात

Ahmednagar News :

घराच्या जागेवरुन झालेल्या वादात माय-लेकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अहमदनगरच्या पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये हा प्रकार घडला आहे. आरोपींविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घराच्या जागेवरून पारनेर परिसरात राहणाऱ्या श्रीमंदिलकर आणि येणारे कुटुंबियांमध्ये वाद सुरु होते. यावरुन दोन्ही कुटुंबियांमध्ये नेहमीच खटके उडत असत. मात्र गुरुवारी या वादाने टोक गाठलं आणि दोन जणांचा जीव यामध्ये गेला आहे. (Latest Marathi News)

गुरुवारी संध्याकाळी किरण श्रीमंदिलकर आणि येणारे कुटुंबात पुन्हा वाद झाला. यावेळी किरण याने शितल येणारे आणि अडीच वर्षांचा स्वराज येणारे यांच्या अंगावर गाडी घातली. यामध्ये शितल आणि स्वराज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Crime News)

याप्रकरणी मृत महिलेची सासू चंद्रकला येणारे यांच्या फिर्यादीवरून किरण श्रीमंदिलकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

श्रीमंदिलकर आणि येणारे हे कुटुंब शेजारी शेजारी राहतात. घराशेजारच्या जागेच्या मोजणीतून दोन्ही कुटुंबात वाद होता आणि त्यातूनच ही घटना घडली असल्याचा आरोप येणारे कुटुंबियांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT