Ahmadnagar Gautami Patil Dance News  Saam TV
महाराष्ट्र

Gautami Patil : अहमदनगरमध्ये गौतमीच्या कार्यक्रमात तुफान राडा; पोलिसांचा लाठीचार्ज, नागरिकांची पळापळ, पाहा VIDEO

गौतमी पाटील हिच्या अहमदनगर येथील कार्यक्रमात तुफान राडा झाला. हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज करावा लागला.

Satish Daud

सचिन बनसोडे, साम टीव्ही

Ahmadnagar Gautami Patil Dance News : लावणी डान्सर गौतमी पाटील ही कायमच चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमाला होणारी मोठी गर्दी आणि त्यामधील वाद ही काही नवी बाब राहिलेली नाही. असाच एक प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. गौतमी पाटील हिच्या अहमदनगर येथील कार्यक्रमात तुफान राडा झाला. हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज करावा लागला. (Latest Marathi News)

त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांची मात्र एकच पळापळ झाली आणि आयोजकांना कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. तसेच मोठ्या बंदोबस्तात गौतमीला कार्यक्रम स्थळावरून बाहेर काढावे लागले. अतिउत्साही प्रेक्षकांना नियंत्रित करताना ६० बाऊन्सरसह आयोजकांची चांगलीच दमछाक झाली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे.

नेमकं काय घडलं?

अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्यातील राहाता येथे गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने तरुणांची उपस्थिती होती. दरम्यान, कार्यक्रम ऐन जोमात असताना काही प्रेक्षकांनी गौतमीवर पैशाची उधळण सुरू केली. त्यामुळे गौतमीने नाराजी व्यक्त करत डान्स थांबवला आणि स्वतः माईक हातात घेत प्रेक्षकांना गोंधळ न करण्याची विनंती केली.

दरम्यान, गौतमीने (Gautami Patil) डान्स थांबविल्याने प्रेक्षकांनी कल्ला करत तुफान राडा घातला. अतिउत्साही प्रेक्षकांना नियंत्रित करताना ६० बाऊन्सरसह आयोजकांची चांगलीच दमछाक झाली. पोलिसांनी (Police) हस्तक्षेप करत गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही गोंधळ सुरूच राहिल्याने अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

यावेळी प्रेक्षकांची एकच धावपळ उडाली आणि आयोजकांना कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. एवढं होऊनही काही प्रेक्षकांनी गौतमी पाटील गाडीत बसत असताना तिच्या गाडीला घेराव घालत गोंधळ घातला. अखेर बाउन्सर आणि पोलिसांच्या गराड्यात गौतमी पाटील कार्यक्रम स्थळावरून बाहेर पडली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला होणारी मोठी गर्दी आणि त्यामधील वाद ही काही नवी बाब राहिलेली नाही. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बहिरवाडी गावात सुद्धा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मोठा राडा झाला होता. कार्यक्रम सुरू असताना काही तरुणांनी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गौतमी पाटील आणि आयोजकांना काही वेळ हा कार्यक्रम थांबवण्याची वेळ आली होती.

मात्र, हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावा यासाठी गावातील महिलांना पुढाकार घेत हातात काठ्या घेऊन उभे राहण्याची वेळ आली. दरम्यान, ग्रामीण भागामध्ये गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यातच तरुण कार्यक्रम सुरू असताना गोंधळ घालत असल्याने अनुचित प्रकार घडताना पहायला मिळतात.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

10 हजार देतो, तुझ्या मुलीला पाठव… लॉकअपमधील आरोपी महिलेकडे पोलीसाची घाणेरडी मागणी; ASI थेट तुरुंगात

South Indian Sambar Recipe: अस्सल साऊथ इंडियन स्टाईल सांबार आता बनवा घरीच, ही आहे सोपी रेसिपी

Pune Rain: पुण्यात अवकाळीचा पहिला बळी, अंगावर झाड कोसळून महिलेचा मृत्यू; ३ तासांपासून पावसाचा कहर सुरू, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : धुळे शहरात सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर, पटेल-तटकरेंची अनुपस्थिती? पडद्यामागे काय घडतंय?

SCROLL FOR NEXT