ahilyanagar news  saam tv
महाराष्ट्र

नगरमध्ये भीषण अपघात; भरधाव टेम्पोने रिक्षाला उडवले, ४ जणांचा जागीच मृत्यू

ahilyanagar accident : अहिल्यानगरमध्ये भीषण अपघतात झालाय. भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत चौघांचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

राज्यात अपघाताचं सत्र सुरू

अहिल्यानगरमधील भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

स्थानिक मदतीला धावले

राज्यात अपघातांचं सत्र थांबेना झालं आहे. अहिल्यानगरच्या शनीशिंगणापूर रोडवर मंगळवारी दुपारी भीषण अपघात झालाय. या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अहमदनगरच्या उंबरे गावात ही अपघाताची घटना घडली. या अपघातानंतर रस्त्यावरील उभे असलेल्या लोकांची एकच धावाधाव झाल्याचे पाहायला मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरच्या राहुरीतील शनीशिंगणापूर रोडवरील उंबरे गावात भयंकर अपघात झाला. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलर आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. भरधाव टेम्पोने रिक्षाला उडवले. या अपघातात रिक्षामधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील काहींची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती मिळत आहे.

अपघात झाल्यानंतर टेम्पो ट्रॅव्हलर उलटला. त्यामुळे या टेम्पो ट्रॅव्हलरमधील प्रवासी देखील जखमी झाले. अपघातानंतर स्थानिकांनी अपघातग्रस्तांच्या मदतीला धाव घेतली. तर काहींना पोलिस आणि रुग्णालयाला माहिती दिली. स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.

रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर

शनीशिंगणापूरच्या रोडवर हा भीषण अपघात झाल्यानंतर अनेकांची धांदल उडाली. रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. टेम्पोने उडवलेल्या रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. रिक्षाला धडक दिल्यानंतर टेप्पो रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात उलटला. या रिक्षातील प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या रिक्षातील एकूण ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातात मृत पावलेल्या लोकांची नावे अद्याप समोर आलेली नाही. या अपघाताने मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कॅप्टन खरातमुळे राजकीय नेता अडचणीत? कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच

जगात गॅस वॉर! इराणचा कतारच्या LNG प्रकल्पावर हल्ला; भारताचं टेंशन वाढणार

Friday Horoscope : करिअर जोरात असणार, नोकरीत पगारवाढ मिळणार; ५ राशींच्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होणार

महाकाय दीडशे फुटांची गुढी, गुढीपाडव्याला कोणत्या जिल्ह्यात काय आकर्षण ठरलं?

तू मला हात का लावला? कल्याणमध्ये KDMC च्या गेटवर तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT