Shirdi Former Police Sub Inspector Kishor Patil  SaamTV
महाराष्ट्र

व्यसनाच्या आधीन गेला, वाद झाल्याने नोकरीही गमावली; साईंच्या शिर्डीत माजी PSI भीक मागताना सापडला; प्रकरण काय?

Former Shirdi Police Sub Inspector Beg : शिर्डीत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भिक्षेकऱ्यांपैकी काहीजण ५ विविध राज्यातील आणि काहीजण महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यातील असल्याचं समोर आलंय आहे.

Prashant Patil

अहिल्यानगर (शिर्डी) : अहिल्यानगरमधील शिर्डीत प्रशासनाने भिक्षेकऱ्यांविरोधात मोहीम सुरू केली असून ७२ जणांना ताब्यात घेत त्यांची रवानगी विसापूर आणि चेंबूर येथील भिक्षेकरीगृहात करण्यात आला आहे. मात्र, यातील एक भिक्षेकरी माजी पोलीस उपनिरीक्षक असल्याचं समोर आलं आहे.

शिर्डीत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भिक्षेकऱ्यांपैकी काहीजण ५ विविध राज्यातील आणि काहीजण महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यातील असल्याचं समोर आलंय आहे. विशेष म्हणजे यातील एक भिकारी मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस उपनिरीक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. किशोर पाटील असं या माजी पोलीस उपनिरीक्षकाचं नाव असून गेल्या १० वर्षांपासून तो शिर्डीत भीक मागत होता.

किशोर व्यसनाच्या आहारी गेला आणि वरिष्ठांशी वाद झाल्याने त्याने नोकरीचा राजीनामा दिला. १० वर्षांपूर्वी किशोर याने शिर्डी गाठत पेपर विक्रीचे काम सुरू केले. मात्र, वाढत्या व्यसनामुळे तो नंतर भीक मागायला लागला. मध्यंतरी मुंबईतील घर विकल्याने त्याच्या बँक खात्यात लाखो रुपये पडून असल्याचे समजते. पण व्यसनासाठी तो शिर्डीत भीक मागून जगत होता. पोलीस कारवाईत त्यालाही ताब्यात घेऊन विसापूर येथील भिक्षेकरीगृहात पाठवण्यात आलं आहे. माजी पोलिस अधिकारी नशेपायी शिर्डीत भीक मागताना आढळून आल्याने हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, नगर तालुक्यातील नेप्ती येथील भाविक कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला निघाले होते. मात्र, पार्किंगमध्ये उभी असलेली त्यांची बस आरटीओ अधिकाऱ्याने ताब्यात घेतली, दंडात्मक कारवाई करून ती आरटीओ कार्यालयात लावली. यावेळी संबंधित अधिकाऱ्याने, "आप प्रयागराज कैसे जाते, अब मैं देखती हूँ" असे म्हणत कारवाई केली, असा आरोप भाविकांनी केला आहे. अचानक बस जप्त केल्यामुळे भाविकांचे कुंभमेळ्याचे नियोजन बिघडले आणि त्यांना प्रयागराजला जाता आले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune University: बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरणी पुणे विद्यापीठाची मोठी कारवाई; रमेश मुखेकर निलंबित

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ

Face Care: चेहरा धुतल्यानंतर २ मिनिटांच्या आत करा हे काम; मेकअपशिवायही ग्लो करेल चेहरा

तुकाराम मुंढे यांचा शाळांसाठी नवा आदेश; शाळेतील मध्यान्ह भोजनासाठी FDAची नवी नियमावली

Thursday Horoscope : आळस टाळा, 4 राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT