Ahilyanagar news Saam tv
महाराष्ट्र

Ahilyanagar : शेतकरी पती- पत्नीचा संशयास्पद मृत्यू; परिसरात खळबळ, घातपात कि आत्महत्या? कारण गुलदस्त्यात

Ahilyanagar news : आई- वडिलांना फोन लावला मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने काळजीत असलेल्या मुलीने जवळच राहणाऱ्या चुलत भावाला संपर्क साधून विचारणा केली. यानंतर त्याने घरी जाऊन पहिले असता धक्कादायक घटना समोर आली

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

राहाता (अहिल्यानगर) : राहाता तालुक्यातील लोणी गावाजवळ असलेल्या सादतपुर शिवारात शेतकरी पती- पत्नीचा एकाच दिवशी गूढ मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यात पत्नीचा मृतदेह शेततळ्यात तर पतीचा घरात मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली असून मृत्यू मागे घातपात आहे की आत्महत्या याचा शोध पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे. 

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील सादतपूर शिवारात गायकर वस्तीवर राहणारे रेवजी मुरलीधर गायकर (वय ६०) आणि त्यांची पत्नी नंदा गायकर (वय ५५) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सासरी राहणारी गायकर दांपत्याची मुलगी आई- वडिलांना फोन लावत होती. मात्र समोरून काहीही प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी तिने जवळच राहणाऱ्या चुलत भावाला संपर्क साधून विचारणा केली. चुलत भाऊ रेवजी यांच्या घरी गेला असता रेवजी जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळून आले. 

दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी 

रेवजी यांच्या तोंडातून फेस आलेला बघून त्याने आजूबाजूच्या लोकांना बोलावले. तसेच रेवजी यांच्या पत्नी नंदा यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता घराजवळच त्यांच्या शेततळ्यात नंदा यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा घटनास्थळी पंचनामा करत आश्वी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

घातपात कि आत्महत्या? कारण गुलदस्त्यात 

मात्र रेवजी यांच्या तोंडातून फेस आल्याचे दिसून आल्याने त्यांनी विष प्राशन केले की त्यांना कुणी पाजले? हे तपासात समोर येईल. यासह नंदा यांचा मृतदेह शेततळ्यात आढळल्याने त्या पाय घसरून पडल्या की त्यांचा घातपात झाला? याचाही तपास पोलिसांना करावा लागणार आहे. दोन संशयपासद मृत्यूच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

Phone Charging: फोन चार्ज करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा आग लागू शकते

Maharashtra Politics : ठाकरेंना रोखण्यासाठी फिल्डिंग? एकनाथ शिंदेंचा अमित शाहांपुढे सीएमपदाचा प्रस्ताव?

Sanjay Gaikwad : कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणं भोवलं, संजय गायकवाडांना दणका; अखेर पोलिसांत गुन्हा, VIDEO

शिवरायांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा, युनेस्काच्या यादीत समावेश, जाणून घ्या नावे | VIDEO

SCROLL FOR NEXT