Pathardi News Saam tv
महाराष्ट्र

Pathardi News : ओढ्याच्या पुरातून जाण्याचा प्रयत्न; दुचाकीसह एक जण गेला वाहून, प्रशासनाकडून शोधकार्य सुरू

Ahilyanagar News : पाथर्डी तालुक्यातील काल मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले, यात अनेक ठिकाणी नदी- नाल्याना पूर आला असून दुचाकीवरून गावाकडे जातांना ओढ्यात वाहून गेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

Rajesh Sonwane

सुशील थोरात 
अहिल्यानगर
: अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी परिसरात सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. यामुळे धायतडकवाडी गावाच्या हद्दीत असलेल्या बोरीच्या ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात तिनखडी येथील एकजण दुचाकीसह वाहून गेल्याची घटना घडली आहे. दरम्यान प्रशासनाकडून शोधकार्य राबविण्यात आले असून अद्याप तपास लागलेला नाही. 

अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील तिनखडी येथील पांडुरंग निवृत्ती आंधळे (वय ७२) असे दुचाकीसह ओढ्यात वाहून गेलेल्या इसमाचे नाव आहे. सदरची घटना सायंकाळी शुक्रवारी घडली आहे. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी मोहटादेवी परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तर धायतडकवाडी गावाच्या हद्दीत असलेल्या बोरीच्या ओढ्याला मोठा पूर आला होता. 

पाण्याच्या प्रवाहात टाकली दुचाकी 

दरम्यान तिनखडी येथील पांडुरंग आंधळे हे कामानिमित्त पाथर्डी येथे गेले होते. त्यानंतर ते सायंकाळी दुचाकीवरून गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. याचवेळी मोहटादेवी परिसरात चारच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्याने बोरीच्या ओढ्याला मोठा पूर आला असताना पांडुरंग आंधळे यांनी ओढ्याच्या पुरातून दुचाकी टाकून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने ते दुचाकीसह वाहून गेले आहेत. 

प्रशासनाकडून शोधकार्य 

यावेळी घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी तत्काळ प्रशासनाला घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर तातडीने तहसीलदार उध्दव नाईक, पोलिस निरीक्षक विलास पुजारी यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेत आंधळे यांचे शोधकार्य चालू केले. मात्र रेस्कु टीम उपलब्ध नसल्याने शोध कार्यात अडथळे निर्माण होत होते. तसेच पाण्याचा प्रवाह देखील जास्त होता. रात्री उशिरापर्यंत प्रशासनाकडून शोधकार्य चालू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Temples: नवरात्रात भाविकांची रेलचेल, मुंबईजवळील देवीची प्रसिद्ध मंदिरे कोणती? जाणून घ्या यादी...

Bhandara Crime : दारूच्या नशेत बारमध्ये तुफान राडा; पोलीस नायकावर फोडला काचेचा ग्लास, पोलिसासह एक जखमी

Famous Actress Mother Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचा मृत्यू, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Accident: मुंब्र्यात थरकाप उडवणारा अपघात, भरधाव कंटेनरखाली चिरडून ३ मुलांचा मृत्यू

जातीय सभा, मेळाव्यांवर बंदी, शासकीय कागदपत्रामध्येही नसणार जात, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT