Shrirampur Crime saam tv
महाराष्ट्र

Shrirampur Crime : हातात बंदुका घेऊन पाठलाग; श्रीरामपुरमध्ये टोळी युद्धाची भीती, घटना सीसीटीव्हीत कैद

Ahilyanagar Shrirampur News : चहाच्या दुकानासमोर दोन गँगमधील सदस्य समोरासमोर आले होते. वादावादी सुरु असताना हुजेफा शेख नामक आरोपीने दुसऱ्या गटातील संघर्ष दिघे याच्यावर अचानक बंदूक ताणली

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

श्रीरामपूर (अहिल्यानगर) : पूर्व वैमनस्यातून दोन गटांनी भर दिवसा एकमेकांवर बंदुका रोखल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात घडली आहे. बंदुका घेऊन पाठलाग करणारे तरुण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. दरम्यान या प्रकारामुळे श्रीरामपूर शहरात टोळी युद्धाच्या भीती व्यक्ती केली जात असून परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

रस्त्यावर उतरत दहशत निर्माण करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. आता तर भर दिवसा असे प्रकार सुरु असल्याचे अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर शहरात समोर आला आहे. शहरातील एका चहाच्या दुकानासमोर दोन गँगमधील सदस्य समोरासमोर आले होते. वादावादी सुरु असताना हुजेफा शेख नामक आरोपीने दुसऱ्या गटातील संघर्ष दिघे याच्यावर अचानक बंदूक ताणली आणि परिसरात एकच गोंधळ उडाला. 

पाठलाग करत ताणली बंदूक 

दरम्यान दिघे यांच्या साथीदारांनी हुजेफा शेख याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, तो शहरातील गल्ल्यांमधून पळू लागला. तर दिघे याच्या साथीदारांनी त्याचा पाठलाग सुरू केला असता पाठलाग करणाऱ्या एका तरुणाच्या हातात देखील बंदूक असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. भर दिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. 

पोलिसात गुन्हा दाखल 

या प्रकाराबद्दल संघर्ष दिघे याने हुजेफा शेख याच्या विरोधात श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस घटनेचा सखोल तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत. भर दिवसा तरुण एकमेकांवर बंदुका ताणत असल्याने श्रीरामपूर शहरात टोळी युद्धाची भिती निर्माण झाली असून पोलिसांना वेळीच पाऊले उचलावी लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT