Ahilyanagar News Saam tv
महाराष्ट्र

Shrigond Pathardi Vidhan Sabha : श्रीगोंदा, पाथर्डीमध्ये भाजपचे उमेदवार निश्चित; पक्षातील नेतेच करणार बंड

Ahilyanagar News : अहिल्यानगरच्या पाथर्डी मतदारसंघात विद्यमान आमदार मोनिका राजळे या तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.

Rajesh Sonwane

सुशील थोरात

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९९ उमेदवारांचे तिकीट जाहीर केले. यात श्रीगोंद्यातून पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर झाली. तर पाथर्डी मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना तिकीट जाहीर झाले. मात्र दोन्हीही ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य सुरू असून या नाराजांना समजावण्यासाठी आता भाजप काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अहिल्यानगरच्या पाथर्डी मतदारसंघात विद्यमान आमदार मोनिका राजळे या तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. मात्र त्यांच्या उमेदवारीला भाजप कडूनच मोठा विरोध केला जात होता. भाजपचे राज्य सरचिटणीस अरुण मुंडे आणि ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी उघडपणे मेळावा घेऊन मोनिका राजळे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. तर भाजपच्या आणि गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्वीपासूनच्या समर्थक असलेल्या जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे या सुद्धा आता बंडाच्या तयारीत असून २०१४ साली हर्षदा काकडे यांना उमेदवारी जाहीर आली होती. मात्र ऐनवेळी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म हा मोनिका राजळे यांना देण्यात आला होता. दुसरीकडे श्रीगोंदा मतदार संघात विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र त्यांचे पुत्र विक्रम पाचपुते यांना उमेदवारी मिळावी, या मागणीसाठी बबनराव पाचपुते आणि प्रतिभा पाचपुते या मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. मात्र आता या उमेदवारीबाबत संभ्रम असून विक्रम पाचपुते यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पाचपुते दाम्पत्य पक्ष श्रेष्ठीकडे केल्याची माहिती समोर येत आहे.

भाजपने मोनिका राजळे यांचे व्यतिरिक्त आम्हाला संधी द्यावी अशी मागणी हर्षदा काकडे, अरुण मुंडे आणि गोकुळ दौंड यांनी केली होती. मात्र राजळे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हर्षदा काकडे यांनी निवडणूक लढवणारच असल्याचे जाहीर केले आहे. तर ओबीसीचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड आणि भाजपचे राज्य सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या भूमिकेकडे संपूर्ण पाथर्डी आणि शेवगाव मतदार संघाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आता मोनिका राजळे यांच्यासमोर स्वपक्षातील नाराजगीचाच मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर गेल्या १४ वर्षांपासून भाजपचे काम करणाऱ्या सुवर्णा पाचपुते यांना उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत त्यांच्या संपर्क कार्यालयातील सर्व भाजप नेत्यांचे छायाचित्र काढून टाकले. तसेच भाजपचे उमेदवार कोणीही असो आपण अपक्ष म्हणून निष्ठावंत भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या तसेच जनतेच्या पाठिंबावर उमेदवारी करणार असल्याचं सुवर्णा पाचपुते होते यांनी सांगितले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

SCROLL FOR NEXT