Ambit Dam Saam tv
महाराष्ट्र

Ambit Dam : मे महिन्यातच आंबित धरण ओव्हरफ्लो; आठ दिवसांपासून सुरु आहे अवकाळी पाऊस

Ahilyanagar News : राज्यात अवकाळीचा मुसळधार पाऊस होत आहे. आता राज्यातील काही भागात मॉन्सून दाखल झाला आहे. मागील पाच- सहा दिवसांपासुन अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत असल्याने नदी, नाले प्रवाहित झाले आहेत

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 
अहिल्यानगर
: राज्यात अवकाळी पाऊस सुरु असून अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यात होत असलेल्या सततच्या पावसाने जिल्ह्यातील पहिले धरण ओव्हरफ्लो झाले आहे. अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड परीसरात असलेले आंबित धरण ओव्हरफ्लो झाले असून मुळा नदी प्रवाहीत झाली आहे. यामुळे परिसरातील पाण्याची समस्या दूर झाली आहे. 

राज्यात अवकाळीचा मुसळधार पाऊस होत आहे. यात आता राज्यातील काही भागात मॉन्सून देखील दाखल झाला आहे. दरम्यान मागील पाच- सहा दिवसांपासुन अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत असल्याने नदी, नाले प्रवाहित झाले आहेत. तर काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्थात मे महिन्यात कधी झाला नाही इतका पाऊस यंदा मे महिन्यात झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

जिल्ह्यातील पहिले धरण ओव्हरफ्लो 
गेल्या आठ दिवसांपासून अकोले तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्याच्या अखेरीस भरणारे आंबित धरण यंदा मात्र मे महिन्यातच ओव्हरफ्लो झाले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांपैकी ओव्हरफ्लो होणारे आंबित हे पहिले धरण ठरले आहे.

जालन्यातील दुधना नदीला पूर 
जालना
: जालना जिल्ह्यामध्ये काल सर्वदूर मुसळधार पाऊस पडला. बदनापूर तालुक्यातील काही गावांमध्ये तर ढगफुटी सदृश्य पाऊस पडलाय. यामुळे बदनापूर तालुक्यातून वाहणाऱ्या दुधना नदीला पूर आला असून नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. गोलापांगरी शिवारातून वाहणाऱ्या नदीला मे महिन्यात पहिल्यांदाच पूर आल्याच ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तर आज सकाळपासून जालना जिल्ह्यात पावसाने उघाड दिली असली तरी जिल्ह्यातील नद्या मात्र प्रवाहित झालेल्या पाहायला मिळत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT