Mahalakshmi Temple Saam tv
महाराष्ट्र

Mahalaxmi Temple : महालक्ष्मी मंदिरात चोरी; ५१ तोळे सोन्याच्या मुकुटासह २ किलो चांदीच्या वस्तू लांबविल्या

Sangamner News : अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात चोरी झाली आहे. जागृत देवस्थान असल्याने याठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 
संगमनेर (अहिल्यानगर)
: चोरट्यानी मंदिरांना लक्ष केले असून देवाच्या अंगावरील दागिन्यांसह दानपेटीतील रोख रक्कम लांबविली जात आहे. अशातच संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र काकडवाडी येथील जागृत देवस्थान महालक्ष्मी माता काकडवाडी मंदिर या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास जबरी चोरीची घटना घडली आहे. यात सोने व चांदीचे दागिने चोरटे घेऊन पसार झाले आहेत. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. 

अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात चोरी झाली आहे. जागृत देवस्थान असल्याने याठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. आलेल्या भाविकांकडून देवीला अलंकार किंवा रोख स्वरूपातील रक्कम मोठ्या प्रमाणात दिली जात असते. मात्र रात्री मंदिर बंद झाल्यानंतर चोरट्यानी संधी साधत दागिने चोरी केले आहेत. 

सोने- चांदीच्या वस्तूंसह मौल्यवान वस्तू लांबविल्या 

काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी महालक्ष्मी मंदिर येथील देवीचा ५१ तोळ्यांचा सोन्याचा मुकुट तसेच दोन किलो चांदीच्या वस्तूसह इतर मौल्यवान वस्तू देखील चोरट्यांनी चोरून नेत पोबारा केला आहे. सकाळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सोन्याचा मुकुट दिसून आला नाही. यानंतर चोरी उघड झाली. या बाबत पोलिसांना माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली. 

सीसीटीव्हीच्या डीव्हीआरही लांबविला 

घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, पोलीस उपनिरीक्षक सातपुते, पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ यांनी भेटी दिल्या आहेत. तपासकामी अहिल्यानगरहून ठसा तज्ञ व शवान पथकाला पाचारण करण्यात आले होते.सदर घटनेचा लवकरात लवकर शोध लावावा अशी मागणी काकडवाडी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान चोरट्यांनी मंदिरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील लांबविला असल्याने चोरट्याना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

RBI Recruitment: इंजिनियर झालात? रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Solapur Temple Tourism: अक्कलकोट ते पंढरपूर, सोलापूरमधील या TOP 8 स्थळांना उन्हाळ्यात नक्कीच भेट द्या, मन होईल प्रसन्न

Ayan Ahmed Case: १८० मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या अयानचा नवा VIDEO समोर, तरुणाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

Summer Hair Care Tips: उन्हाळ्यात दररोज केस धुवावे की नाही? घाम आणि कोंडा होऊ नये म्हणून काय करावे?

SCROLL FOR NEXT