SHIRDI NASHIK HIGHWAY ACCIDENT: TWO KILLED, 15 INJURED IN ST BUS AND ERTIGA CAR COLLISION Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Ahilyanagar Shirdi Bus Accident News : अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी-नाशिक महामार्गावर एसटी बस आणि एर्टिगा कारमध्ये भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी तत्काळ बचावकार्य केले.

Alisha Khedekar

  • शिर्डी-नाशिक महामार्गावर बस आणि कारची समोरासमोर धडक

  • भीषण अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू

  • दुर्घटनेत एकूण १५ जण जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर

  • पोलिसांनी तातडीने बचावकार्य करून जखमींना रुग्णालयात दाखल केले

सचिन बनसोडे, नाशिक

Ahilyanagar Shirdi Nashik Highway Bus Car Accident अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला. राज्य परिवहन महामंडळाची (ST) बस आणि एर्टिगा कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे १५ जण जखमी झाले आहेत. हा अपघात शिर्डी जवळील सावळीविहीर हद्दीत घडल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल येथून शिर्डीकडे (Panvel Shirdi ST Bus) येणारी एसटी बस नियमित प्रवासी वाहतूक करत होती. त्याचवेळी एर्टिगा कार नाशिकच्या दिशेने जात होती. सावळीविहीर परिसरात दोन्ही वाहनांमध्ये अचानक भीषण धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेत बसमधील आणि कारमधील मिळून १५ जण जखमी झाले. काही जणांना किरकोळ दुखापती झाल्या असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच शिर्डी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्परता दाखवत बचावकार्य सुरू केले आणि जखमींना बाहेर काढून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले.

विशेष म्हणजे, काही गंभीर जखमींना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी पोलिसांनी स्वतःच्या वाहनांचा वापर करून त्यांना शिर्डी येथील साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी मिळून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अपघाताने मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Update: राज्यात कधीपासून सुरू होणार पाऊस? मान्सूनबाबत महत्वाची अपडेट आली समोर

महाराष्ट्रातील ९० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १,८१७ कोटी; या ५ जिल्ह्यांत सर्वाधिक लाभार्थी

Savitribai Jyotirao Phule Serial: टीव्हीनंतर आता यूट्यूबवर; 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेच्या डिजिटल प्रवासाला सुरुवात

Maharashtra News Live Update: नागपुरात आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

Mangal Dosh: मंगळमुळे लग्न जमेना! 'या'५ खात्रीशीर उपायांनी दूर होईल मंगळदोष

SCROLL FOR NEXT