Ahilyanagar Accident Saam Tv
महाराष्ट्र

Accident: मध्यरात्री महामार्गावर अपघाताचा थरार, खासगी बसची कंटेनरला धडक; अनेक प्रवासी गंभीर जखमी

Ahilyanagar Bus Accident: अहिल्यानगरमध्ये खासगी बसला भीषण अपघात झाला. बसने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये चालकासह ६ प्रवासी गंभीर जखमी झालेत.

Priya More

Summary -

  • अहिल्यानगर–पुणे महामार्गावर मध्यरात्री खासगी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात

  • बस चालकासह अनेक प्रवासी गंभीर जखमी

  • धडक इतकी जोरदार की बसचा पुढील भाग चक्काचूर झाला

  • कंटेनर चालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत

अहिल्यानगरमध्ये खासगी बसला भीषण अपघात झाला. बसने कंटेनरला पाठीमागून धडक दिली. अहिल्यानगर -पुणे महामार्गावर हा अपघात झाला. या अपघातामध्ये बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या अपघातामध्ये बसच्या चालकासह अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. अहिल्यानगर पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर शहरातील केडगाव परिसरात नगर - पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला. पुण्याहून छत्रपसंभाजीनगरकडे जाणारी शिवाई बस कंटेनरवर आदळली. कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे हा अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धडक इतकी जोरदार होती की यात शिवाई बस चालकाच्या पायाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

या अपघातामध्ये बसमधील ५ ते ६ प्रवासी जखमी झाले आहेत. तर २ प्रवाी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर अहिल्यानगर शहरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. सुदैवाने या भीषण अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. पण या अपघातामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण होते. प्रवासी गाढ झोपेत असताना हा अपघात झाल्यामुळे ते प्रचंड घाबरले होते. पोलिस सध्या अपघाताचा तपास करत आहेत. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरात बारा पोलिसांवर कारवाईची टांगती तलवार

Pune Corporation Election: पुण्यात भाजप शिवसेना युती तुटल्याची "इन्साइड स्टोरी"; १५ जणांची यादी "साम" च्या हाती

New Year 2026 Wishes Marathi : नववर्षाच्या शुभेच्छांनी आणखी गोड होईल तुमचा दिवस! Status, Story साठी खास मेसेज

१० वर्षांपूर्वी फॉर्म हाऊसवर कसे पकडले गेले? तिकीट कापल्यानंतर इच्छुक उमेदवाराचा भाजप आमदारावर गंभीर आरोप

कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीनं भरला राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज, VIDEO

SCROLL FOR NEXT