Ahilyanagar News Saam Tv
महाराष्ट्र

Crime : लाथाबुक्क्यांनी मारलं, चाकूने वार केला, अहिल्यानगरमध्ये पैशांच्या वादातून तरुणाची हत्या

Ahilyanagar Kopargaon Crime News : अहिल्यानगरातील कोपरगाव तालुक्यात प्लॉटच्या उसने पैशांवरून झालेल्या वादातून ३५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या. पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • प्लॉटच्या उसने पैशांवरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या

  • तरुणावर लाथाबुक्क्या व चाकूच्या वारांनी हल्ला

  • पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

  • चार आरोपींना अटक

अहिल्यानगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्लॉटच्या व्यवहारातील उसने पैसे परत मागितल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एका ३५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली असून या प्रकरणी चार जणांविरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना अहिल्यानगरमधील कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द गावात घडली असून मृत तरुणाचे नाव अस्लम शहाबुद्दीन सय्यद असे आहे. अस्लम याचा प्लॉटच्या व्यवहारातील उसने पैसे परत मागितल्याच्या कारणातून काही तरुणांशी वाद झाला. या वादातून संतापलेल्या काही तरुणांनी अस्लमवर हल्ला केला. या हल्ल्यात अस्लमचा जागीच मृत्यू झाला.

आरोपींनी अस्लम याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याच्यावर चाकूने वार करत त्याची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला आहे.

तसेच पोलिसांनी मुनीर उर्फ मुन्ना अजिज शेख, परविन मुनीर शेख, फिरोज मुनीर शेख आणि साहिल मुनीर शेख या चार जणांना हत्या प्रकरणात ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांच्या सुक्षितेतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT