Brinjal Price Kolhpur
Brinjal Price Kolhpur  Saamtv
महाराष्ट्र

Brinjle Price: बळीराजाची पुन्हा थट्टा! कोल्हापुरात वांग्याला प्रति किलो 27 पैसे दर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

kolhapur: गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात झालेली घसरणीने बळीराजा हैराण झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत आपल्या पीकांवर नांगर फिरवल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. मात्र आता कांद्यापाठोपाठ वांग्यालाही कवडीमोल दर मिळाल्याने शेतकरी वर्गामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात वांग्याला 27 पैसे किलोचा दर मिळाला आहे. त्यामुळे कांद्यानंतर आता वांगेही मातीमोल दरानं विकण्याची वेळ शेतक-यावर आली आहे. (Latest Marathi News)

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका हा भाजीपाला उत्पादनासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. मात्र या तालुक्यात तयार झालेल्या वांग्याला कवडीमोल भाव मिळालेला आहे. शिरोळ तालुक्यातील शेतकरी विक्रमसिंह जगदाळे यांनी आपल्या शेतामध्ये वांग्याची लागवड केली. या वांग्याची विक्री व्हावी यासाठी त्यांनी शेतीतील संपूर्ण माल हा पेठ वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत पाठवला. मात्र त्यांच्या वांग्याला प्रति किलो 27 पैसे इतकं नीचांकी दर देण्यात आला आहे.

यातून शेतकऱ्याचा वाहतूक खर्च देखील निघाला नसून रात्रंदिवस शेतात राबवून शेतकऱ्याच्या हाती अखेर निराशा पडली आहे. बाजारात ग्राहक 20 ते 30 रुपये किलो दरानं वांगी खरेदी करत आहेत. मात्र शेतक-याच्या हातात केवळ 27 पैसे पडत आहेत. आजपर्यंतचा हा सर्वात नीचांकी दर आहे.

शेतकऱ्याला फक्त वांगी तोडणी आणि वहातुक खर्चासाठी अडीच हजार रुपये इतका खर्च आला. पण, याच वांग्याला अवघे एक किलोसाठी 27 पैसे इतका दर मिळाला आहे. एका बाजूला 27 पैसे इतक्या नीचांकी दराने शेतकऱ्याकडून वांगी खरेदी केली जात असून बाजारात मात्र हीच वांगी 30 ते 40 रुपये किलो विकली जात आहे. यामुळे शेतकऱ्याने देखील अनेक सवाल उपस्थित केले आहेत. जो पिकवतो त्याला 27 पैसे आणि ग्राहकाला मात्र 30 ते 40 रुपये किलोने वांगे भेटत असतील तर मधल्या पैशांमधील तफावत ही तपासण्याची गरज असल्याचे जगदाळे यांनी म्हटले आहे. (Agriculture News Kolhapur)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips On Mobile: मोबाईलवर ठेवा हे वॉलपेपर, नशीब बदलेल

Harshaali Malhotra : बजरंगी भाईजानच्या 'मुन्नी'ला आता पाहिलं का?, ओळखणं ही झालंय कठीण

Ramdev Baba : रामदेव बाबा यांना सुप्रीम कोर्टाचा झटका; न्यायालयाने पुन्हा याचिका फेटाळली, IMA च्या अध्यक्षांनाही बजावली नोटीस

Rupali Chakankar News : रुपाली चाकणकरांना ईव्हीएमची पुजा भोवणार?

Met Gala 2024मध्ये सौंदर्यवतींच्या नजाकती, फॅशनवर खिळल्या नजरा

SCROLL FOR NEXT