Abdul Sattar Latest News  Saam TV
महाराष्ट्र

Abdul Sattar : अब्दुल सत्तार पुन्हा अडचणीत; औरंगाबाद खंडपीठाने दिले चौकशीचे आदेश, काय आहे प्रकरण?

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे.

साम टिव्ही ब्युरो

Abdul Sattar Latest News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणारे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद खंडपीठाने औरंगाबाद शहरातील जिन्सी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. बुधवारी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. त्यामुळे सत्तार (Abdul Sattar) यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

काय आहे प्रकरण?

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या सर्व्हे क्रमांक ९२३३ येथील जागेच्या व्यवहारासंदर्भात डॉ. दिलावर मिर्जा बेग यांनी मंत्री सत्तार यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. त्याअनुषंगाने कक्ष अधिकारी यांनी चौकशीचे व प्रशासक मंडळ, संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश १७ डिसेंबर २०२१ रोजी दिले होते.  (Maharashtra News)

त्यासंदर्भात चौकशी समितीदेखील स्थापन करण्यात आली होती. या आदेशाविरुध्द तत्कालीन मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे व इतरांनी अ‍ॅड. प्रसाद जरारे यांच्या वतीने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.

संबंधित तक्रारदार डॉ. दिलावर मिर्जा बेग हे जाणीवपूर्वक मोठ्या आर्थिक व्यवहारांबाबत मंत्री अब्दुल सत्त्तार यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात व कोणतेही अधिकार नसताना मंत्री अशा अर्जांवर आदेश पारीत करतात. अशाच प्रकारे जिन्सी येथील जमीनीबाबत देखील चुकीचे आदेश दिले असल्याचे अॅड. जरारे यांनी न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणुन दिले होते.

बुधवारी आयुक्तांनी संबंधित विषय आपल्या कार्यकक्षेबाहेरील असल्याचे स्पष्ट केल्यानंतर खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. संजय देशमुख यांनी महसूल विभागाच्या सचिवांना चौकशीचे आदेश दिले. सिलबंद लिफाफ्यात सचिवांनी २४ नोव्हेंबर रोजी अहवाल सादर करावा असे आदेश देण्यात आले आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुणाला किती मिळणार गॅस सिलिंडर? टंचाई होणार दूर,वितरणासाठी राज्य सरकारचा नवा प्लॅन

दर्शनासाठी तासनतास रांग.., भुकेलेल्या साई भक्तांवर उपासमारीची वेळ; गॅस टंचाईमुळे प्रसादालयातून डाळ-भात वगळला|VIDEO

Maharashtra Live News Update : धुळ्यात वीज वितरण विभागाच्या गलथान कारभाराचा फटका बसला गहू उत्पादक शेतकऱ्याला

मुख्यमंत्र्यांच्या हॅलीपॅड कॅम्पसमध्ये अचानक बैल घुसला; हवालदार जीव मुठीत घेऊन धावला, नेमकं काय घडलं?

गॅस सिलिंडर तुटवड्यावर काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? VIDEO

SCROLL FOR NEXT