Buldhana : रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात, सडलेले सोयाबीन जाळून आंदोलनाला सुरुवात संजय जाधव
महाराष्ट्र

Buldhana : रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात, सडलेले सोयाबीन जाळून आंदोलनाला सुरुवात

31 ऑक्टोबरला बुलढाण्यात एल्गार मोर्चा; तर विदर्भ-मराठवाडा-खान्देशात मोठ्या स्वरूपात आंदोलन पेटवू - रविकांत तुपकर

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : आज बुलढाणा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी एकत्र येत सडलेले सोयाबीन जाळून आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांकडून विविध मागण्या करण्यात आल्या.

हे देखील पहा :

राज्य सरकारने जाहीर केलेली मदत तोकडी असून अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी 50 हजार रु.मदत देण्यात यावी, सोयाबीनचा प्रति क्वि. दर 8 हजार रुपये व कापसाचा प्रति क्वि. दर 12 हजार रुपये स्थिर राहावा यासाठी केंद्र सरकारने धोरण आखावे, ओला दुष्काळ जाहीर करावा यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या.

तसेच या मागण्यांसाठी 31ऑक्टोबरला बुलढाण्यात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भ-मराठवाडा-खान्देशात मोठ्या स्वरूपात आंदोलन उभारणार असल्याची घोषणा रविकांत तुपकर यांनी केलीय. सोयाबीन जाळून बुलढाण्यात सोयाबीन-कापसाच्या आंदोलनाची ठिणगी पडली आहे. तुपकरांच्या नेतृत्वात सोयाबीन-कापूस उत्पादकांचे आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विकास गोगावले यांना जामीन मंजूर

'सोंगाड्या'चं नाव देशभर गाजलं; गावगाड्यातील तमाशा सम्राटाला पद्मश्री, रघुवीर खेडकर आहेत तरी कोण?

Kalyan Tourism : शहराच्या गजबजाटापासून दूर 'या' ठिकणी घ्या निवांत विश्रांती, कल्याणजवळील निसर्गरम्य पर्यटन स्थळ

ऐन जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत खळबळ; काँग्रेसच्या महिला उमेदवाराचे अपहरण?

Jio Recharge Plan: फक्त 198 रुपयांत 28GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग; Jio चा स्वस्त प्लॅन

SCROLL FOR NEXT