वाढत्या महागाई विरोधात पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादीचे आंदोलन  गोपाल मोटघरे
महाराष्ट्र

वाढत्या महागाई विरोधात पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादीचे आंदोलन

पिंपरी चिंचवड शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे सातत्याने वाढणारे दर व घरगुती गॅस दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे सातत्याने वाढणारे दर व घरगुती गॅस दर वाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. पिंपरी चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ हे आंदोलन करण्यात आले. Agitation of NCP in Pimpri Chinchwad against rising inflation

हे देखील पहा -

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चुल पेटवून गॅस दर वाढीचा निषेध केला. केंद्र सरकार दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेल दर वाढ करून सर्वसामान्य नागरिकांच जगणं मुश्किल करत आहे. त्यात पुन्हा केंद्र सरकारने गॅस दरवाढ करून सर्वसामान्यांच्या दुःखहावर मीठ चोळण्याचे काम केले असल्याचा आरोप आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला .

या आंदोलनादरम्यान मोदी सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल व गॅस दर वाढ त्वरित मागे घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी; मनसे कार्यकर्त्यांना रीलस्टारला काळे फासून माफी मागायला लावली

Amazon Sale: शॉपिंगसाठी तयार राहा! ॲमेझॉनच्या सर्वात मोठ्या सेलच्या तारखेची घोषणा, जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर

गणपती मिरवणुकीत भाजप अन् ठाकरे गटात मोठा गोंधळ; ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल

नांदेडनंतर अकोल्यात असंवेदनशीलतेचा कळस, कृषीमंत्र्यांसमोरच अधिकारी मोबाईलवर मश्गुल

IAS Officer Transfer: प्रशासनात मोठा बदल! १० वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

SCROLL FOR NEXT