संजय राठोड
महाराष्ट्र

ऐन दिवाळीत फासे पारधी समाज बांधवांचे विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन!

एकीकडे देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना सगळीकडे दिवाळीची लगबग सुरू असतानाच फासे पारधी समाजातील नागरिकांनी मात्र जिल्हाधिकारी कार्यालयावर 'अंधार यात्रा' काढून विविध मागणी साठी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- संजय राठोड

यवतमाळ :- एकीकडे देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना सगळीकडे दिवाळीची लगबग सुरू असतानाच फासे पारधी समाजातील नागरिकांनी मात्र जिल्हाधिकारी कार्यालयावर 'अंधार यात्रा' काढून विविध मागणी साठी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

हे देखील पहा :

आदिवासी फासेपारधी समाज संघटनेचे अध्यक्ष मतीन भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू करून फासे पारधी समाजाच्या भूमिहीन नागरिकांना ई-क्लास किंवा सी-क्लासची शेतजमीन देण्यात यावी, तसेच जमिनीचे पट्टे फासे पारधी बांधवांच्या नावे करावे, जिथे फासे पारधी बेडा आहे, अशा ठिकाणी अंगणवाडी सुरू करावी, बेड्यावर दहा वर्षापासून राहणाऱ्या नागरिकांच्या नावाने गाव नमुना आठचे दाखले द्यावे, पक्की घरे बांधून द्यावी, फासे पारधी जातीचेच जात प्रमाणप्रत्र बेड्यावर उपलब्ध करून द्यावे, प्रकल्प कार्यालयांमार्फत स्वयंरोजगार साठी प्रत्येकी दीड लाखाचे आर्थिक सहाय्य द्यावे या मागणी साठी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

फासे पारधी समाजातील नागरिकांनी दि.३ नोव्हेंबर रोजी कीटा कापरा येथून अंधार यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढली. अंधार यात्रा आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाली. दरम्यान या यात्रेत फासे पारधी समाजातील हजारो नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाले. मागण्या पुर्ण जो पर्यंत होत नाही, तो पर्यंत आमचा ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचा ईशारा फासे पारधी समाजातील नागरिकांनी दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pravin Gaikwad Breaking : मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांना शिवप्रेमींनी काळं फासलं

Air India Plane Crash: विमानाचे इंधन स्विच कसं बंद झालं? तज्ज्ञाने व्यक्त केला संशय

Loco Pilot Salary: ट्रेन ड्रायव्हर म्हणजे लोको पायलटचा पगार किती असतो?

Maharashtra Live News Update : - भात लावणीच माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साक्री तालुक्यामध्ये अद्यापही भात लावणीला सुरुवात नाही

उज्ज्वल निकमांची राज्यसभेवर नियुक्ती, संतोष देशमुख हत्याप्रकरणाची केस आता कोण लढणार? VIDEO

SCROLL FOR NEXT