Sakshi Sunil Jadhav
डोक्यावर अंमल करणारी आपली रास. घातपात, अपघाताचे योग असले तरी त्यातून सहज बाहेर याल. आरोग्य चांगले राहील. पण डोकेदुखी यापासून काळजी घ्यावी लागेल.
प्रेम केले आहे तर ते निभवावे लागेल. काही अपयश, अडचणीच्या घटना आज त्याबाबत घडणार आहेत. सध्या मौन राखणे अथवा समजून घेणे हे जास्त बरे राहील. खर्च वाढता राहील.
मित्र-मैत्रिणींच्या बरोबर दिवस व्यस्त राहील. बोलून समोरच्याला आपलेसे कराल. अनेक लाभ होणार आहेत. नव्याने काही ओळखी होतील. दिवस चांगला आहे.
मनोबल चांगले राहण्यासाठी विशेष प्रयत्नशील राlहाल. समोरच्याला आपल्या स्वभावामुळे अगत्यामुळे आपलेसे कराल. दिवस उत्तम आहे.
काहीतरी वेगळे करण्याच्या मनस्थितीत असाल तर आज त्याला यश मिळणार आहे. द्रुतगती प्रवास घडतील.
पोटावर अंमल असणारी आपली रास आहे. तब्येतीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जीवनात येणाऱ्या शंका ठीक आहेत पण विनाकारण कुशंका नको.
सामोपचाराने दिवस घालवणे आज गरजेचे आहे. म्हणेल तसे यशही पदरात पडेल व्यवसायामध्ये संसारामध्ये दोन्हीकडे समसमान समाधान मिळेल.
आपली रास मुळात कोणाच्या वाटेला जात नाही. पण आपल्या मध्ये अडचणी उद्भभणारे काम कोणी करणार असेल तर त्याला आज तुम्ही सोडणारही नाही.
सद्गुरूंची उपासना विशेष फलदायी ठरेल. आज एकादशीचे फलही उत्तम मिळणार आहे.मला जोगती कामे घडतील. विद्यार्थ्यांना दिवस अनुकूल आहे .
घरी जेष्ठांची सेवा करावी लागेल. ज्येष्ठांच्या निर्णयाने जा .जागा खरेदी-विक्रीचे व्यवहार असतील तर जुन्या गोष्टींमधून फायदा संभवतो आहे.
अशक्य गोष्टी आज शक्य होणार आहेत. खूप दिवस झगडत असलेल्या गोष्टींना आज सहज यश मिळेल. अनेक प्रकारचे लाभ सुद्धा होतील. शिक्षणामधून लाभ होईल.
कौटुंबिक जिव्हाळा वाटणारे छोटे कार्यक्रम आज होण्याची शक्यता आहे. मनस्वास्थ चांगलं राहण्यासाठी अध्यात्माकडे कल ठेवावा लागेल.