अकोला - भारतीय जनता महिला आघाडीच्या वतीने आज अकोल्यातील खुले नाट्यगृह चौक येथे काँग्रेसचे (congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्यांच्या प्रतीकात्मक फोटोला काळी शाई लावून तसेच चपला मारून भाजपच्या (BJP) महिला आघाडीने रोष व्यक्त केला. यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक होत्या. नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली.
हे देखील पहा -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात अपशब्द काढून नाना पटोले यांनी नविन वाद उफाळून घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द काढल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीने रोष व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांनी खुले नाट्यगृह चौकामध्ये नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन केले. नाना पटोले यांच्या फोटोला काळी शाही लावून त्यांच्या फोटोला चपलाही मारल्या. यावेळी भाजपच्या महिला आघाडीतर्फे नाना पटोले यांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.