Maharashtra Mla Fund Distribution 2023 Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Monsoon Session: प्रशांत बंब यांना ७४२ कोटी; तर जयंत पाटील, रोहित पवारांवरही निधीचा वर्षाव; कुणाला किती मिळाला निधी? यादी आली समोर...

Maharashtra Vidhan Sabha Monsoon Session: प्रशांत बंब यांना ७४२ कोटी; तर जयंत पाटील, रोहित पवारांवरही निधीचा वर्षाव; कुणाला किती मिळाला निधी? यादी आली समोर...

Rashmi Puranik

Maharashtra Mla Fund Distribution 2023: राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर कुणाला किती निधी मिळाला यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यातच अधिवेशनाच्या १५ दिवस आधी आलेल्या नेत्यांना अर्थमंत्री अजित पवार यांनी भरघोस निधी दिलेला आहे. इतकंच नाही तर अजित पवार गटात न आलेल्या पण शरद पवार यांच्या बरोरब असलेल्या नेत्यांना भरघोस निधी मिळाला आहे.

यंदाच्या अधिवेशनात सर्वाधिक निधी हा भाजप आमदार प्रशांत बंब यांना सर्वाधिक निधी देण्यात आला आहे. बंब यांना ७४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांना ५८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासोबतच तर माजी मंत्री राजेश टोपे यांना २९३ कोटी आणि आमदार रोहीत पवार २१० कोटी निधी देण्यात आला आहे.

याशिवाय अजित पवार यांच्या बरोबर आलेल्या नेत्यांनाही भरगोस निधी देण्यात आला आहे. यात मकरंद पाटील यांना २९१ कोटी, किरण लाहामाते यांना ११६ कोटी आणि दिलीप वळसे पाटील यांना ९६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

कोणत्या आमदाराला किती मिळाला निधी?

  • प्रशांत बब गंगापूर : ७४२ कोटी

  • जयंत पाटील इस्लामपूर, वाळवा : ५८० कोटी

  • दत्ता भरणे इंदापूर : ४३६ कोटी

  • राजेश टोपे, घनसावंगी : २९३ कोटी

  • मकरंद अबा पाटील , वाई : २९१ कोटी

  • रोहीत पवार कर्जत जामखेड : २१० कोटी

  • भरत गोगावले, महाड : १३४ कोटी

  • उदय सिंह राजपूत (ठाकरे गट) कन्नड : १२४ कोटी

  • किरण लहमाते, अकोले (अहमदनगर) : ११६ कोटी

  • दिलीप वळसे पाटील, आंबेगाव : ९६ कोटी

  • अजित पवार, बारामती : ७३ कोटी

  • विनोद निकोले, डहाणू : ७६ कोटी

  • अब्दुल सत्तार, सिल्लोड : ५८ कोटी

  • महेंद्र दळवी (शिंदे) अलिबाग : ४५ कोटी

  • महेंद्र थोरवे, (शिंदे) कर्जत : ४८ कोटी

  • अदिती तटकरे, श्रीवर्धन : ४० कोटी

  • संदीप क्षीरसागर, बीड : ३५ कोटी

  • माणिकराव कोकाटे, सिन्नर : ३३ कोटी

  • छगन भुजबळ, येवला : ३१ कोटी

  • संदीपन भूम्रे, पैठण : २९ कोटी

  • महेश बाल्डी (भाजप), उरण : २८ कोटी

  • प्रकाश साळुंखे (अजित पवार), गेवराई : १३ कोटी

  • हसन मुश्रीफ, कागल : २२ कोटी

  • धनंजय मुंडे, परळी : २१ कोटी

  • संतोष बंगर, कलमनुरी : १९ कोटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT