Devendra Fadnavis on CM Post : दुसरं कुणीही मुख्यमंत्री होणार नाही; महायुतीच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीसांचा कडक शब्दांत इशारा

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री बदलाचा काहीही विचार नाही.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Saam TV
Published On

गिरीश कांबळे

Mumbai News : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक बदल झाले. अजित पवारांनी सरकारमध्ये सामील होताच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

मात्र  अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतीत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राष्ट्रवादीचे काही नेतेही याबाबत उघडपणे वक्तव्य करताना दिसत होते. मात्र या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहणार आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री बदलाचा काहीही विचार नाही. कुठल्याही पक्षाच्या लोकांना वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. पण या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहणार आहेत. यात कुठलाही बदल होणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. (Political News)

महायुतीमध्ये असलेल्या नेत्यांनी अशी वक्तव्य करू नयेत. संभ्रम निर्माण होईल अशी वक्तव्ये करू नयेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे नेते पतंगबाजी करत आहेत. 10 तारीखेला काही होणार नाही, 11 ला देखील काही नाही. किती संभ्रम निर्माण केला तरी काही होणार नाही. झालंच काही तर आमचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मुख्यमंत्री तारीख ठरवतील त्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. (Latest News Update)

Devendra Fadnavis
Jayant Patil Meet To Sunil Tatkare : भेटीचा वेगळा अर्थ काढू नका, सुनील तटकरेंसोबतच्या गळाभेटीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

अजित पवार यांनाही याबाबत स्पष्टपणे सांगितलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच राहणार आहे. आगामी निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढवल्या जातील, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

महायुतीत जर कुणी अशी संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य करत असतील तर माझं वक्तव्य कानउघाडणी करण्यासाठी पुरेसं आहे. समझने वाले को इशारा काफी होता है. आमचे सगळे जण समंजस आहेत. त्यामुळे त्यांना इशारा मिळाला असेल, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com