Nandurbar News Saam TV
महाराष्ट्र

Nandurbar News: इंजिनिअरिंग केली अन् शेतकरी झाला, कमवले लाखो रुपये; वाचा तरुणाच्या यशाची कहाणी

Engineer Farmer Struggling Story: नंदुरबार तालुक्यातील कोठली गावातील सुशिक्षित युवकाने शिक्षणात इंजिनिअरिंगची पदवी सोबतच बीएससी पदवी देखील धारण केली. उच्चशिक्षीत या तरुणाने आता शेतीमधून लाखोंचं उत्पन्न मिळवलं आहे.

Ruchika Jadhav

Nandurbar News:

आधुनिकतेची कास धरली तर शेती कशाप्रकारे यशस्वी होते याचं उत्तम उदाहरण समोर आलं आहे. नंदुरबार तालुक्यातील कोठली गावातील सुशिक्षित युवकाने शिक्षणात इंजिनिअरिंगची पदवी सोबतच बीएससी पदवी देखील धारण केली. उच्चशिक्षीत या तरुणाने आता शेतीमधून लाखोंचं उत्पन्न मिळवलं आहे.

सागर पाटील असं या शेतकरी तरुणाचं नाव आहे. इंजिनिअरिंग व बीएससी ऍग्री सारखी मोठी पदवी हाती असताना सुद्धा कोणत्याही प्रकारची नोकरी न करता त्याने शेती करण्याचा निर्णय घेतला. शेतीमधून त्याने मिळवलेलं यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

नंदुरबार तालुक्यातील कोठली येथील सागर शांतीलाल पाटील यांने ज्ञान, अभ्यासातून आपल्या शेतीत सुधारणा घडवली. नोकरी न करता स्वत:चा व्यवसाय करायचा असं त्यांच्या डोक्यात आधीपासून होतं. त्यामुळे त्याने सुरुवातीला बाजारपेठेचा अभ्यास केला. बाजारात कोणत्या भाजीला जास्त मागणी आहे. याची माहिती मिळली.

त्यानंतर त्याने आपल्या जमीनीचा अभ्यास केला. गावात दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने जमीन सुपीक बनवण्यासाठी त्याने ठिबक सिंचन पद्धतीचा वापरल केला. पुढे मिरची, पपई, केळी अशा प्रमुख पिकांची माहिती संपादन केली.

या पिकांसोबत शेतीचे उत्तम नियोजन करून त्यातून शेतीतील अडथळे दूर करण्यास सुरुवात केली. तरुणाने 12 एकर क्षेत्रात केळी 3 एकरमध्ये कारली, 3 एकरमध्ये पपई आणि 3 एकरमध्ये मिरचीची लागवड केली. पाण्याचे उत्तम नियोजन करत तरुण सध्या आधुनिक पद्धतीने शेती करून यातून चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT