Maharashtra New Expressway Saam Tv
महाराष्ट्र

New Expressway: महाराष्ट्राला मिळणार आणखी एक एक्स्प्रेस वे, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा; कसा असणार मार्ग?

Maharashtra New Expressway: महाराष्ट्राला आणखी एक नवा एक्स्प्रेस वे मिळणार आहे. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणादरम्यान त्यांनी ही घोषणा केली. आत नवा एक्स्प्रेस वेचा मार्ग कसा असणार आहे घ्या जाणून...

Priya More

समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण नुकताच झालं. समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. महाराष्ट्राला आणखी एक नवा एक्स्प्रेस वे मिळणार आहे. त्याचसोबत समृद्धी महामार्गाचा विस्तार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा नवा एक्स्प्रेस वे कुठे असणार आहे त्याचा मार्ग कसा असणार आहे? हे आपण जाणून घेणार आहोत...

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात नवा एक्स्प्रेस वे लवकरच तयार करण्यात येणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हा एक्स्प्रेस वे बांधण्यात येणार आहे. चारोटी ते इगतपुरी असा हा एक्स्प्रेस वे असणार आहे. या नव्या एक्स्प्रेस वेमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कारण या भागातील शेतकऱ्यांचा शेतमाल थेट बंदरापर्यंत पोहचवण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमात समृद्धी महामार्गाच्या विस्ताराबद्दल देखील सांगितले. त्यानुसार, समृद्धी महामार्ग आता पालघर जिल्ह्यातील वाढवन बंदारापर्यंत वाढवला जणार आहे. समृद्धी महामार्गामुळे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा फायदा होत आहे. कारण राज्यातील जवळपास २४ जिल्हे जेएनपीटी बंदाराला जोडले गेले आहेत.

आता जर समृद्धी महामार्गाचा विस्तार झाला तर राज्यातील आणखी जिल्हे जेएनपीटी आणि वाढवन बंदरासोबत जोडले जाणार आहे. समृद्धी महामार्गाचा विस्तार होऊन तो वाढवन आणि जेएनपीटीला जोडला गेला तर त्यामुळे राज्याच्या विकासात भर पडेलच त्याचसोबत शेतकऱ्यांना आपला शेतमाल लवकर आणि कमी तासांमध्ये बंदरापर्यंत पोहचवण्यास मदत होईल. याचा फक्त शेतकरीच नाही तर नागरिकांना देखील फायदा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bottle Gourd Leaves Benefits: आरोग्याचा खजिना, दररोज दुधी भोपळ्याची पाने चावून खाल्ल्याने होतील भन्नाट फायदे

Maharashtra Live News Update: वसई विरार महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून पृथ्वीराज बी पी यांची नियुक्ती

Shocking : धक्कादायक! भर रस्त्यात महिलेला जमिनीवर पाडलं, कपडे फाडले अन्...; कुठे घडली भयंकर घटना?

राज्याच्या प्रशासनात उलथापालथ, तुकाराम मुंढे यांच्यासह १० बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Coconut Water Vs Sugarcane Juice: शरीरातील उष्णता घालवण्यासाठी नारळ पाणी पिणे चांगले की ऊसाचा रस? आरोग्यासाठी निवडा योग्य पर्याय

SCROLL FOR NEXT