Crime  Saam tv
महाराष्ट्र

Nashik : खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एक कांड, नामांकित कंपनीत महिलांवर लैंगिक अत्याचार अन्...

Nashik MNC sexual harassment case details : नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ९ गुन्हे दाखल असून ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. एसआयटीकडून सखोल तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

अभिजीत सोनावणे, नाशिक | साम टीव्ही

Nashik crime, sexual harassment case, MNC scandal : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे नाशिक आणि गुन्हेगारीची राज्यात चर्चा सुरू झाली आहे. त्यातच आता नाशिकमधून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि मानसिक अत्याचार होत असल्याचा संतापजनक प्रकार उघड झालाय. या प्रकरणी नाशिकमध्ये ९ गुन्हे दाखल झाले आहेत. नाशिक पोलिसांनी या प्रकरणी ६ जणांना बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

स्थानिक प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांवर विनयभंग, लैंगिक आणि मानसिक अत्याचाराची प्रकरणं उघड झाली आहेत. धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप करण्यात येत आहे. महिला विनयभंग आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आतापर्यंत ९ गुन्हे दाखल झाले आहेत. धार्मिक भावना दुखावणे १, बलात्कार १, विनयभंग ४, विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावणे ३ असे एकूण ९ गुन्हे मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार विनयभंग केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी आतापर्यंत ६ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथकाची स्थापना (SIT) करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला आहे.

एसआयटी आणि पोलिसांकडून सर्व खासगी संस्थांना महिलांच्या सुरक्षेबाबत कडक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आणखी पीडित महिलांच्या तक्रारीसाठी पोलिसांकडून ९१२३२३२३११ हा हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आह. तसेच कंट्रोल रूम ११२ वर संपर्क करता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाणार असल्याचेही एसआयटीने सांगितले आहे. भोंदू अशोक खरातनंतर नाशकात बहुराष्ट्रीय कंपनीतील आणखी महिलांचे लैंगिक शोषणाचा प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: भररस्त्यात भाजप कार्यकर्त्याची हत्या, ९ गोळ्या झाडत जागीच संपवलं; पुणे हादरले

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे ₹१५०० बंद होणार, ई-केवायसीबाबत सरकारने दिली महत्वाची अपडेट

राज्यातील ५९ RTOऑफिसची १ मेपासून विशेष तपासणी मोहीम; नियम मोडणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर होणार कडक कारवाई

आपच्या खासदारानंतर आता 'या' राज्यातील अख्खा पक्षच भाजपमध्ये विलीन होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Weight Loss Foods: डाएटमध्येही खाऊ शकता हे ७ स्ट्रीट फूड, वजनावर काहीच होणार नाही परिणाम

SCROLL FOR NEXT