Beed: युक्रेनमध्ये एक दिवस कॉलेज करून बीडचा विद्यार्थी अखेर परतला..! विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed: युक्रेनमध्ये एक दिवस कॉलेज करून बीडचा विद्यार्थी अखेर परतला..!

गावात तोफा वाजवत, औक्षण करून केलं स्वागत

विनोद जिरे

बीड: रशिया (Russia)- युक्रेन युद्ध सुरू असल्याने, युक्रेनमधील (Ukraine) नागरिकांना आपला जीव वाचवण्यासाठी देश सोडावा लागत आहे. तर दुसरीकडे याच युक्रेनमध्ये हजारो भारतीय (Indian) नागरिकांसह विद्यार्थी (Student) अडकले असून नागरिकांचे बेहाल सुरू आहेत. अडकलेल्या नागरिकांना आणण्यासाठी भारत सरकारने (India Government) ऑपरेशन गंगा सुरू केले आहे. यामुळं आता बीड (Beed) जिल्ह्यामधील विद्यार्थी युक्रेनहून सुखरूप आपल्या घरी परतत आहेत. तर असाच बीड जिल्ह्यातील विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकला होता. त्याने केवळ एक दिवसाचे कॉलेज केलं असून आपल्या गावी तो आता सुखरूप पोहचला आहे. (After a day college Ukraine Beed student finally returned)

हे देखील पहा-

विशेष म्हणजे यावेळी तोफा वाजवत औक्षण करण्यात आले आहे. बीडच्या आष्टी (Ashti) तालुक्यातील अनिकेत लटपटे हा विद्यार्थी, वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन देशातील खार्किव्ह येथे गेला होता. युद्ध सुरू झाल्यापासून तो तिकडे अडकून पडला होता. रशियाच्या सीमेवर युक्रेन मधील खार्किव्ह हा प्रांत आहे. तेथून भारतात परतण्यासाठी अनिकेतसह अनेक भारतीय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. भारत सरकारच्या ऑपरेशन गंगा अंतर्गत आखलेल्या विशेष मोहीमेद्वारे या विद्यार्थ्यांचे आगमन झाले आहे. सुरुवातीला त्याला खार्किव्ह पासून रोमानिया बार्डरपर्यंत रेल्वे आणि पायी प्रवास करावा लागला.

रोमानियाच्या बॉर्डर वर पोहचल्यानंतर तेथे भारतीय परराष्ट्र खात्याने त्यांचे स्वागत करून त्यांना भारतात आणण्यात आले. तर अनिकेत याने त्याच्या खडतर आणि अशक्य वाटणारा भारतात परतण्याचा प्रवास, केवळ भारत सरकारच्या ऑपरेशन गंगामुळे शक्य झाल्याचे अनुभवातून सांगितले आहे. अनिकेत याच्यासाहित जिल्ह्यातील इतर 3 विद्यार्थी देखील बीडमध्ये परतले आहेत. तर आपल्या पाल्यास भारतात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आमदार बाळासाहेब आजबे,भाजपचे आमदार सुरेश धस, राम सातपुते यांनी मदत केल्याचे अनिकेतचे वडील भाऊसाहेब लटपटे यांनी सांगितले आहे. दरम्यान युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या अनिकेत हा केवळ एकच दिवस कॉलेजला गेलाय. त्यामुळं अनिकेतची पुन्हा युक्रेनला शिकण्याची इच्छा आहे. मात्र पुढे काय होणार ? यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : पवार-ठाकरेंच्या सूचनेवरुन मनोज जरांगेशी संवाद, त्यानंतर माघार; असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट

Winter Season: हिवाळ्यात मध खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

Success Story: लंडनमधील कोट्यवधींची नोकरी सोडली, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS ऑफिसर दिव्या मित्तल यांची यशोगाथा

Viral Video: बाईक की टेम्पो! दुचाकीवरून ८ जणांचा प्रवास, पोलिसांनी जोडले हात, व्हिडीओ पाहून हैराण व्हाल!

PM Awas Yojana: PM आवाससाठी आता पोर्टलवरून अर्ज! १.८० लाखांची सबसिडी मिळणार, प्रक्रिया आणि कार्यप्रणाली कशी आहे?

SCROLL FOR NEXT