raosaheb danve saam tv
महाराष्ट्र

Jalna : दानवेंच्या गावात 30 वर्षानंतर निवडणूक; दानवेंची प्रतिष्ठा पणाला

ग्रामपंचयत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कडून दानवेंना आव्हान...

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना - राज्यासह जालना (Jalna) जिल्ह्यात ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे ग्रामपंचयतीवर आपलं वर्चस्व कायम राखण्यासाठी नेत्यांसह कार्यकर्त्यांनी ही कंबर कसली आहे. या निवडणुकीत अनेक नेत्यांच्या प्रतिष्ठा ही पणाला लागणार असल्याने नेत्यांकडून ही ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात राहावी म्हणून शर्तीचे प्रयन्त सुरू आहे.या ग्रामपंचयात निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात सत्तेचे गणित मांडणाऱ्या मोठ्या मोठ्या नेत्यांना ही डोके उठवणारी ठरणार आहे. (Jalna Latest News)

केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी राजकारणात पहिल पाऊल टाकलं ते ही ग्रामपंचयत निवडणुकीतूनच त्यांनी पहिल्यांदा गावच्या सरपंच पदाची धुरा सांभाळत राजकारणात एन्ट्री घेत दिल्ली गाठली. मात्र गेल्या तीस वर्ष त्यांच्या जन्मगाव असलेल्या जवखेडा खुर्द गावात तब्बल ३० वर्षानंतर निवडणुकीचा धुरळा उडणार असल्याने पंचकृषित या ग्रामपंचयत निवडणुकीने सर्वांचं लक्ष वेधले आहे.

ग्रामपंचयत विविरोध व्हावी या साठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रयन्त करून ही त्यांच्या पॅनलला या वर्षी निवडणुकीचा सामना करण्याची वेळ आल्याने ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनलीय.केंद्रीय मंत्री दानवे यांच्या जवखेडा खुर्द गावात गेली तीन दशके बिनविरोध होणाऱ्या 7 सदस्यांच्या आणि सरपंच पदाच्या निवडणुकीत 4 सदस्य बिनविरोध निवडून आले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलने सरपंच आणि 3 सदस्य पदासाठी उमेदवार रिंगणात उतरविल्याने जवखेडा खुर्द गावात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना पहायला मिळणार आहे. त्यामुळे पंचकृषीसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

आपल्या गावातील ग्रामपंचयत निवडणूक 30 वर्षाच्या परंपरेनुसार बिनविरोध व्हावी.या साठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शर्तीचे प्रयन्त ही केले. मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनल कडून सरपंच पदासाठी सुनिता संतोष दानवे यांचा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या भाऊजई सुमन मधुकर दानवे यांच्या विरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जवखेडा खुर्द गावात 30 वर्षानंतर सरपंच आणि 3 सदस्य पदासाठी निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.

त्यामुळे या निवडणुकीत भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी सरळ लढत होणार असल्याने विजयाची पताका कुणाच्या हाती लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे तब्बल ३० वर्षानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची प्रतिष्ठी गावातच पणाला लागली असल्याने तालुक्यासह जिल्ह्यात चर्चाना उधाण आलं असल्याने या निवडणुकीचा निकाल काय लागतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : सरकारी लाडकींना अखेर दणका, 2,289 जणांचा लाभ बंद; आता निलंबन कधी? VIDEO

Melava Teaser: वाघ नेमकी कुणाची शिकार करणार? ठाकरे बंधूंच्या मेळाव्याच्या नव्या टीझरची चर्चा

Diabetes: हाय ब्लड शुगर असल्यास 'या' गोष्टी खाणं टाळा

Maharashtra Politics: मराठीवरून मविआत फूट? ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला दोन्ही काँग्रेसचा दुरावा

Fuel Ban Rules Update : भाजप सरकारचा यू-टर्न; थेट ६२ लाख वाहनधारकांना दिलासा मिळणार

SCROLL FOR NEXT