Maharashtra Political News Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political News: राज्यातील सत्ता संघर्षावरील निकाल २-३ दिवसांत येणार; उज्वल निकम यांनी व्यक्त केली शक्यता

Maharashtra Political News: निकाल त्यापूर्वीच म्हणजेच दोन दिवसांत येऊ शकतो, अशी शक्यता जेष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे.

मंगेश कचरे

Nagpur News: सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लवकरच येणार आहे. कारण घटनापीठातील एक न्यायाधीश हे 15 मे रोजी निवृत्त होणार आहे. त्यामुळे निकाल त्यापूर्वीच म्हणजेच दोन दिवसांत येऊ शकतो, अशी शक्यता जेष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

जेष्ठ विधिज्ञ उज्वल निकम म्हणाले, 'सत्ता संघर्षातील ज्या प्रलंबित याचिका त्या सगळ्यांचा निकाल एकत्रित लागण्याची शक्यता आहे. 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात निर्णय कोणी घ्यायचा हा मूळ प्रश्न त्यात असणार आहे. घटनेच्या दहाव्या परिस्थितीनुसार अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष घेत असतात'.

'तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेची नोटीस बजावली होती. मात्र, त्या सोळा आमदारांनी त्या उपाध्यक्षच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. उपाध्यक्षांना निर्णय घेता येत नसल्याने सर्वोच न्यायालय काय निर्णय घेत याकडे लक्ष आहे, असेही निकम म्हणाले.

'निर्णय काय होईल हे आज सांगता येणार नाही मात्र कायद्याचा अभ्यास किंवा विश्लेषण करताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते की भविष्यात अशा पद्धतीने राज्यात कुठेही सत्ता संघर्षाचा पेच निर्माण होऊ नये, झाल्यास त्याच निराकरण घटनेनुसार व्हावी असा न्यायालयाचा दृष्टिकोन असेल, असेही निकम पुढे म्हणाले.

'राज्यपालांच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी सुद्धा सुनावणी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. राज्यपालांनी कुठल्या पुराव्याच्या आधारावर बहुमत चाचणीवर सरकार अल्पमतात आलं. पण त्यालाही असं उत्तर दिलं होतं की तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याने ती बहुमत चाचणी होऊ शकली नाही, असेही निकम म्हणाले.

'सरकार अल्पमतात गेलं. त्यानंतर शिंदे गट बहुमत चाचणीमध्ये यशस्वी झालं, पण राज्यपालांच्या कृतीबद्दल सर्वोच्च न्यायालय काय भाष्य करेल हे सांगताना कठीण आहे, असेही निकम पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

SCROLL FOR NEXT