Adulterated Sweets Curly tales
महाराष्ट्र

Adulterated Sweets: ऐन सणासुदीत भेसळीचा काळाबाजार; बाजारात विकला जातोय नकली खवा?

Adulterated Sweets: दिवाळीच्या दिवसात मिठाई खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र बाजारात बनावट मिठाई करणाऱ्यांचा सुळसुळाट वाढलाय. त्यामुळे मिठाई खरेदी करताना खबरदारी घेणं आवश्यक आहे.

Vinod Patil

दिवाळी म्हणजे आनंदाचा सण, वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ करून आपण हा सण साजरा करतो. सणाचा गोडवा वाढावा म्हणून अनेकजण बाजारातून मिठाई खरेदी करताय, पण जरा थांबा..तुम्ही विकत घेत असलेली मिठाई तुमचं आरोग्य बिघडवू शकते. ही मिठाई तुम्हाला आजारी पाडू शकते. हे आम्ही अशासाठी म्हणतोय कारण सध्या सगळीकडे भेसळखोरांचा सुळसुळाट झालाय मिठाईसाठी लागणाऱ्या खव्यात सर्रास भेसळ केली जातेय.

छत्रपती संभाजीनगरच्या पडेगाव परिसरातल्या मिटमिट्यात पामतेल, वनस्पती तूप, खाण्याचा सोडा, मिल्क क्रीम वापरून केवळ अर्ध्या तासात भेसळयुक्त खवा तयार करण्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणलाय. पोलिसांनी मिल्क अँड डेअरी प्रॉडक्टच्या नावाखाली सुरू असलेल्या कारखान्यावर छापा टाकून 425 किलो भेसळयुक्त खवा जप्त केलाय. कदाचित तुम्ही खात असलेल्या मिठाईत या भेसळयुक्त खव्याचा वापरही केलेला असू शकतो.

भेसळयुक्त मिठाई कशी ओळखाल?

मिठाईची चाचणी घेण्यासाठी थोडासा खवा हातात घेऊन दाबाव. खवा खरा असेल तर दाणेदार दिसेल, आणि स्निग्ध वाटल्यास खवा नकली आहे असं समजा.. दुसरा मार्ग म्हणजे गरम पाण्यात खवा टाकून 2 मिनिटं थांबा. खवा असली असेल तर तो पाण्यात विरघळतो आणि त्याचे फॅट्स पाण्यावर तरंगतात. खवा नकली असेल तर पाण्यात फेसाचा थर तयार होतो.

अस्सल रसगुल्ला आणि रसमलाई तोंडात विरघळते. पाकातून रसगुल्ला काढून तो पिळून घ्या, असं केल्यानंतर पाकाचा रंग स्पष्ट राहिला तर गोड खरा आहे, तर बनावट मिठाईच्या पाकाचा रंग थोडा वेगळा असू शकतो.

सणासुदीच्या काळात झटपट श्रीमंत होण्यासाठी सामान्य जनतेच्या आरोग्याशी हा खेळ खेळला जातोय. अशी बनवाट मिठाई खाल्लानं तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतो. विषबाधा होऊन तुमचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे मिठाई खरेदी करताना काळजी घ्या. कुणी भेसळ करत असेल तर संबंधित यंत्रणेला तत्काळ माहिती द्या. तुमची खबरदारी कुणाचा तरी जीव वाचवेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: विधानसभेसाठी मनोज जरांगेंचा फुलप्रुफ प्लॅन, मविआला बसणार फटका? वाचा स्पेशल रिपोर्ट

Sharad Pawar: निवडणूक आयोगाचा शरद पवार गटाला मोठा दिलासा; Trumpet च्या चिन्हाचं भाषांत्तर 'ट्रम्पेट' च

Prakash Ambedkar: निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रकाश आंबेडकरांची प्रकृती खालवली; रक्तात आढळली गाठ

Maharashtra News Live Updates: कल्याण पश्चिम विधानसभेतील शिवसेना शिंदे गटाचे बंडखाेर उमेदवार अरविंद मोरे यांची माघार

Fire Cracker Blast: स्कुटीवरून फटाके नेताना अचानक स्फोट झाला; Video बघून काळजाचा थरकाप उडेल

SCROLL FOR NEXT