Aditya Thackeray saam tv
महाराष्ट्र

Aditya Thackeray's Reaction: 'कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील जनताही गद्दारांच्या राजवटीला त्यांची जागा दाखवून देईल'

Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटक निवडणुकीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दाखवली व आशेचा किरण दाखवला, उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

Chandrakant Jagtap

Aditya Thackeray's Reaction on Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मिळवलेल्या स्पष्ट बहुमताननंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसचे अभिनंदन केले आहे. कर्नाटकाप्रमाणेच महाराष्ट्रातील जनताही गद्दारांच्या अनैतिक, भ्रष्टाचारी राजवटीला त्यांची जागा दाखवून देईल असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून म्हटलं की, कर्नाटकात 40 टक्के कमिशन सरकार असेल तर महाराष्ट्र जबरदस्तीने त्याहून अधिक भ्रष्ट, बिल्डर-कंत्राटदारांच्या राजवटीत ढकलला गेला आहे, जे असंवैधानिक, अनैतिक आणि भ्रष्टाचारी आहे.

कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्रातील जनता या गद्दरांच्या राजवटीला त्यांची जागा दाखवून देईल, पहिल्याच संधीत आपल्याला निवडणुकीत मतदान करण्याची संधी मिळेल! कर्नाटकातील त्यांच्या शानदार विजयासाठी @INCIndia चे अभिनंदन! जनतेने दाखवून दिले आहे की ते शांतता, प्रेम आणि भ्रष्ट शासनाच्या विरोधात निर्णायकपणे मतदान करतील.

हा मोदी-शहांच्या हुकूमशाहीचा पराभव - उद्धव ठाकरे

'देशातील एकाधिकारशाही व हुकूमशाहीचा पराभव होण्याची सुरुवात कर्नाटकातील विजयाने झाली आहे. कर्नाटकच्या जनतेने शहाणपणाने दिलेल्या निकालाबद्दल त्यांचे अभिनंदन,' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कर्नाटक निवडणुकीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दाखवली व आशेचा किरण दाखवला. काँग्रेसचा प्रचंड विजय झालाच, पण पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांच्या बळजबरी सत्तेचे जोखड कर्नाटकच्या जनतेने निर्भयपणे फेकून दिले, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

'कर्नाटकच्या निवडणुकीत हिंदू, मुसलमान, बजरंगबली, हिजाबसारखे धार्मिक तणावाचे मुद्दे चालले नाहीत. काँग्रेसने लोकांच्या प्रश्नांवर निवडणूक लढवली व जिंकली. २०२४ सालच्या विजयाची ही नांदी आहे. प्रियंका गांधी व राहुल गांधी यांचे खास अभिनंदन,' असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. (Latest Political News)

भाजपवर जनतेचा रोष - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी (NCP Leader Sharad Pawar) मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. कर्नाटकच्या जनतेने भाजपला निकारले आहे. मोदी-शहांनी सभा घेऊनसुद्धा तिथल्या जनतेचा भाजपवर रोष व्यक्त होईल अशी खात्री होती. कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव होईल.' तसंच, कर्नाटकचे चित्र देशभर दिसेल असा विश्वास व्यक्त करत शरद पवार यांनी यावेळी काँग्रेसपक्ष आणि उमेदवाराचे अभिनंदन केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांच्यावर यवतमाळच्या महागांव पोलिसात गुन्हा दाखल

Methi Tea Benefits: पावसात आरोग्य हवेय चांगलं? मग दररोज प्या मेथी दाण्यांचा चहा

गाव हादरलं! जनावरांच्या गोठ्यात सापाच्या पिल्लांचा सापळा; एकाच ठिकाणी आढळली ६० नागाची पिल्लं

Kisan Credit Card: ५ लाखांचं कर्ज अन् फक्त ४ टक्के व्याजदर; बळीराजासाठी सरकारची योजना नक्की आहे तरी काय?

Rice Dhirde Recipe : वाटीभर तांदळाच्या पिठापासून झटपट बनवा धिरडे, लहान मुलांसाठी पौष्टिक नाश्ता

SCROLL FOR NEXT