Aditya Thackeray  saam tv
महाराष्ट्र

Aditya Thackeray: राहुल गांधी-केजरीवालांची भेट, शरद पवारांकडे पाठ? आदित्य ठाकरेंचे खासदारांना खडेबोल

Aditya Thackeray : शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा केलेला सत्कार आणि कौतुकामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. आदित्य ठाकरेंनी दिल्लीत राहुल गांधी आणि केजरीवाल यांची भेट घेतली. परंतु शरद पवार यांची भेट घेणं टाळलं.

Bharat Mohalkar

आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. मात्र पवारांची भेट घेणं टाळलंय. आदित्य ठाकरेंनी पवारांची भेट का टाळलीय? आणि आपल्या खासदारांनाही आदित्य ठाकरेंनी खडेबोल का सुनावलेत? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

दिल्लीत शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा केलेला सत्कार आणि कौतूकामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडलीय. तर ठाकरे गटाने पवारांवर थेट टीकास्त्र डागलंय.त्यापार्श्वभुमीवर इंडिया आघाडीची पुढची दिशा ठरवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवालांची भेट घेतली. मात्र पवारांच्या भेटीकडे पाठ फिरवली.

इंडिया आघाडीतील बिघडलेले सूर जुळवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी आधी राहुल गांधींची भेट घेतली. मात्र यावेळी ठाकरेंचे खासदार मात्र शिंदे गटाच्या स्नेहभोजनाला उपस्थित होते. त्यामुळे खासदारांवर नाराज झालेल्या आदित्य ठाकरेंनी खासदारांसाठी आचारसंहिताच आखून दिलीय.

ठाकरेंची खासदारांना आचारसंहिता?

शिंदे गटाच्या स्नेहभोजनाला जाण्यापुर्वी परवानगी घ्या

खासदारांची वज्रमूठ कायम ठेवा

खासदारांनी आपापसातील संवाद कायम ठेवा

आपल्या या दिल्ली दौऱ्यात आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवालांची भेट घेत इंडिया आघाडीतील दरी सांदण्याचा प्रयत्न केलाय. सोबतच आपल्या खासदारांचा कानोसा घेत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न ही केला आहे. आता त्यात ते किती यशस्वी ठरतात हे बघणं उत्सुकतेच ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या जून्या कोपरी पुल आठ दिवस वाहतूकीसाठी बंद..

Oil India Recruitment: ऑइल इंडियामध्ये सरकारी नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Mumbai 26 July 2005 Rain : मुंबईतील 'त्या' भयानक दिवसाला 20 वर्षे पूर्ण! | VIDEO

Yoga For Eyes: डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी दररोज करा 'हे' योगासन

सोलापूरात नवऱ्यानं बायकोच्या डोक्यात फरशी मारली; जागीच मृत्यू, कारण फक्त.. नक्की काय घडलं? | Crime

SCROLL FOR NEXT