aditya thackeray in dapoli saam tv
महाराष्ट्र

Dapoli: 'जय शिवराय' च्या घाेषणेनं दापोली दणाणली; आमदार याेगेश कदमांचे शक्तीप्रदर्शन

आज दापाेलीत माेठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.

अमोल कलये

दापोली : जय भवानी....जय शिवाजी...छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघाेषात आज छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं दापाेलीत (dapoli) राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. (aditya thackeray latest marathi news)

या पुतळ्याच्या अनावरण श्रेयवादाच्या कात्रीत रखडलं होतं. दापोलीचे आमदार योगेश कदम (mla yogesh kadam) आणि माजी आमदार सुर्यकांत दळवी (former mla suryakant dalvi) आणि राष्ट्रवादाचे माजी आमदार संजय कदम (former mla sanjay kadam) यांच्यातील वादात महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण रखडलं होते. सुरुवातीला दोन वेगवेगळ्या तारखा देखील या अनावरणासाठी जाहीर झाल्या परंतु त्या रद्दही झाल्या हाेत्या. अखेर आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत पुतळ्याच्या अनावरणाचा आज मुहूर्त मिळाला.

दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेकडून डावलण्यात आलेले आमदार योगेश कदम हे सेनेच्या व्यासपीठावर पहायला मिळाले. यावेळी आमदार कदम यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तसेच पोस्टरबाजी देखील करण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT